Rules change from 1st March : 1 मार्चपासून ‘हे’ नियम बदलणार, एकदा वाचा

WhatsApp Group

Rules change from 1st March 2024 | नवीन नियम नवीन महिन्याच्या सुरूवातीस लागू होतात. 1 मार्चपासून पैसे आणि तुमच्या बजेटशी संबंधित अनेक नियम बदलत आहेत. या नियमांमधील बदलामुळे तुमच्या बजेटवर आणि तुमच्या खिशावरही परिणाम होणार आहे. 1 मार्चपासून लागू होणाऱ्या नियमांमध्ये फास्टॅग, एलपीजी गॅस सिलिंडर यांसारख्या अनेक मोठ्या अपडेटचा समावेश आहे.

एलपीजी सिलिडरची किंमत

1 मार्चपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची किंमत जाहीर करतात. 1 मार्च रोजीही तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता सर्वांचे लक्ष 1 मार्चकडे लागले आहे. असे मानले जात आहे, की यावेळी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतीत किंचित घट करू शकतात. सध्याच्या गॅस सिलिंडरच्या दरांवर नजर टाकल्यास, 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.

1 मार्चपासून फास्टॅगचे नियम बदलणार

जर तुमच्या गाडीत फास्टॅग बसवलेले असेल, तर तुम्हाला त्याचे केवायसी करण्याची शेवटची संधी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगचे KYC पूर्ण करण्यासाठी 29 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. जर तुम्ही निर्धारित मुदतीत केवायसी पूर्ण केले नाही तर तुमचा फास्टॅग काळ्या यादीत टाकला जाईल किंवा निष्क्रिय केला जाईल. असे झाल्यास दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल.

हेही वाचा – BCCI Central Contract मधून ईशान किशन, श्रेयस अय्यरची हकालपट्टी!

14 दिवस बँक बंद

मार्च महिन्यात बँकांना दीर्घ सुट्ट्या असणार आहेत. महिन्यातून 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. दोन शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश केल्यास मार्च महिन्यात बँका 14 दिवस बंद राहतील.

सोशल मीडियाचे नवीन नियम

सरकारने आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियम 1 मार्चपासून लागू होणार आहेत. नवीन नियमांनुसार X, Facebook, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया ॲप्सवर चुकीची तथ्ये पोस्ट केल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. सोशल मीडिया सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment