रोहित शर्माची वाघासारखी इनिंग, टीम इंडियाने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

WhatsApp Group

Champions Trophy 2025 : भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ५ विकेट्सने हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईत खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित राहिला आणि चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ४९ षटकांत ६ गडी गमावून २५४ धावा करून विजय मिळवला. भारताने १० महिन्यांपूर्वी आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. तेव्हाही रोहित कर्णधार होता. रोहित आणि विराटसाठी ही चौथी आयसीसी ट्रॉफी आहे. अंतिम सामन्यात रोहितची बॅट बोलली. त्याने भारताला जलद सुरुवात देऊन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. यापूर्वी, भारताने २००२ मध्ये श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती, तर २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली होती.

२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. गिल ५० चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने त्याचा अप्रतिम झेल घेतला. यानंतर विराट कोहली एक धाव काढून पायचित झाला. कर्णधार रोहित शर्मा ८३ चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ४८ धावा करून बाद झाला तर अक्षर पटेलने २९ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या १८ धावा करून बाद झाला. केएल राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला तर जडेजा ९ धावांवर नाबाद राहिला. किवी संघाकडून सँटनर आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

रोहित ठरला हिरो

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फक्त ४ कर्णधारांनी ५० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. आता या यादीत रोहित शर्माचे नावही जोडले गेले आहे. सौरव गांगुली, सनथ जयसूर्या आणि हँसी क्रोन्जे यांच्यानंतर आता रोहितने ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीला मागे टाकत त्याने आणखी एका विक्रमाच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. रोहित आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. रोहितला या महामुकाबल्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment