या श्रीमंत माणसाकडे 300 फेरारी, 500 रोल्स रॉयस, 450 मर्सिडीज आणि सोन्याचे विमान आहे!

WhatsApp Group

एक माणूस किती आरामदायी, वैभवशाली जगणं जगेल यांची व्याख्या करणं कठीण आहे. सुख-दुःखाप्रमाणेच दिवस-रात्र, विजय-पराजय, श्रीमंती आणि गरिबी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही जणांना दोन वेळचे जेवण मिळताना अडचणी येतात, तर काही जण त्यांच्याकडील अमाप संपत्ती आणि चैनीचा आनंद लुटतात.

ब्रुनेई देशाचे सुलतान हसनल बोलकिया (Brunei Sultan Hassanal Bolkiah) हे याच चैनीच्या जीवनावर जगणाऱ्यांपैकी एक आहेत. विशेष म्हणजे बोलकियांचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे. ब्रुनेई हा एक आशियाई देश आहे, जो मलेशिया आणि दक्षिण चीन समुद्राने वेढलेला आहे. जगभरातील सुंदर समुद्रकिनारे आणि वर्षावनांसाठी ब्रुनेईचे बेट प्रसिद्ध आहे.

जागतिक बँकेच्या निर्देशांकानुसार, 2021 मध्ये या देशाची लोकसंख्या केवळ 4.45 लाख होती, जी नोएडापेक्षा खूपच कमी आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या छोट्या देशाचा सुलतान जगातील सर्वात श्रीमंत राजा मानला जातो. आपल्या विलासी जीवनासाठी बोलकियांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाते.

4000 कोटी रुपयांच्या फक्त गाड्या

हसनल बोलकिया यांच्याकडे 4000 कोटी रुपयांच्या फक्त गाड्या आहेत. त्यांच्या खासगी कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस, बेंटलेसह अनेक लक्झरी कार आहेत. एका रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे सुमारे 300 फेरारी आणि 500 ​​रोल्स रॉयस कार आहेत. यातील निम्म्याहून अधिक गाड्यांची खरेदी 1990 मध्येच झाली होती. याशिवाय बेंटलेसह इतर आलिशान कारचे कलेक्शनही त्यांच्या शोरूममध्ये आहे. याशिवाय 250 हून अधिक लॅम्बोर्गिनी, 250 हून अधिक अ‍ॅस्टन मार्टिन, 170 हून अधिक बुगाटी, 230 हून अधिक पोर्श, 350 बेंटली, 440 मर्सिडीज, 260 हून अधिक ऑडी, 230 हून अधिक बीएमडब्ल्यू आणि 220 हून अधिक जग्वार्स, 180 हून लँड रोव्हर या लक्झरी कार आहेत.

हेही वाचा – पुस्तकांचा महाराष्ट्रातील एकमेव बगिचा, तब्बल 33 गुठ्यांत साकारलाय प्रकल्प!

बोलकियांचे आयुष्य स्वप्नातल्या राजकुमारासारखं आहे. त्यांनी 1984 मध्ये ब्रुनेईचे सिंहासन स्वीकारले, त्यानंतर आजपर्यंत ते पंतप्रधान आणि सुलतान या पदावर राहिले आहेत. बोलकियांच्या महालाचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे. त्यांच्या राजवाड्यात 5 स्विमिंग पूल, 1700 खोल्या, 200 वातानुकूलित तबेले, 300 फेरारी, 500 रोल्स रॉयसस गा़ड्या आणि 100 गॅरेज आहेत, ज्यामध्ये त्याच्या आलिशान गाड्या पार्क केल्या आहेत यावरून त्याच्या शाही भव्यतेची कल्पना करू शकता.

सोन्याचा महाल आणि सोन्याचे विमान

एका अहवालानुसार, ब्रुनेईच्या सुलतानाकडे सोन्याने जडवलेले खासगी जेट आहे, ज्याची किंमत 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या विमानातील वॉश बेसिनही सोन्याची आहे. विमानात 950 कोटींहून अधिक किमतीच्या चैनीच्या वस्तू आहेत. इतकेच नाही तर सुलतानच्या पॅलेस इस्ताना नुरुल इमान पॅलेसचा घुमट देखील 22 कॅरेट सोन्याचा आहे, ज्याची किंमत सुमारे 2,550 कोटी रुपये आहे. याशिवाय सुलतानकडे 92 कोटी रुपयांचे हिरेही आहेत. सुलतानची एकूण संपत्ती 2.88 लाख कोटी रुपये आहे. ब्रुनेईचा राजवाडा सुमारे 20 लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment