Bank News : ‘या’ बँकेकडून धक्का..! लोन झालं महाग; भरावा लागणार जास्तीचा EMI

WhatsApp Group

RBL Bank Hikes MCLR : तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने आदल्या दिवशी रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वाढवले ​​आहेत. यामुळे ग्राहकांना व्याजाच्या स्वरूपात जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आता RBL ने व्याजदरात वाढ जाहीर केली आहे. RBL बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात ०.२० टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता RBL बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे.

सर्व प्रकारची कर्जे महाग होतील

MCLR वाढवण्याचा परिणाम वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृह कर्ज यासारख्या सर्व प्रकारच्या कर्जांवर होईल. जर तुमचे कर्ज आधीच चालू असेल तर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त EMI भरावे लागेल. मे २०२२ पासून आतापर्यंत RBI ने रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांनी सहा वेळा वाढ केली आहे. गेल्या वेळी RBI ने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

हेही वाचा – Horoscope Today :’या’ राशींवर आज धनवर्षाव, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे बँक ज्या दराने कर्ज देऊ शकते. MCLR दर २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता. विविध बँकांची कर्जे निश्चित करता यावीत म्हणून असे करण्यात आले. MCLR मधील वाढ किंवा घट EMI वर परिणाम करते. MCLR वाढला तर जास्त EMI द्यावा लागतो, जर कमी झाला तर EMI कमी द्यावा लागतो.

RBL चे नवीन MCLR दर

  • एका वर्षासाठी – १०.१५ टक्के
  • एका महिन्यासाठी – ९.०५ टक्के
  • तीन महिन्यांसाठी – ९.३५ टक्के
  • सहा महिन्यांसाठी – ९.७५ टक्के

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment