RBI MPC Meet : घर, गाडी घेणाऱ्यांसाठी दिलासा..! रिझर्व्ह बँकेने दिली खुशखबर; जाणून घ्या!

WhatsApp Group

RBI MPC Meet : घर खरेदीदार आणि गृह-ऑटो कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने (MPC) वर्षभरात पहिल्यांदाच रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीनंतर गव्हर्नर दास यांनी सांगितले की, रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला जाईल. मे 2022 पासून रेपो दरात 6 वेळा वाढ करण्यात आली आहे. या दरम्यान एकूण 2.50 टक्के रेपो दर वाढवण्यात आला आहे.

रेपो रेट हा दर आहे ज्यावर व्यावसायिक बँका RBI कडून पैसे घेतात. होम-ऑटोसह बहुतेक किरकोळ कर्जे या रेपो दरावर आधारित आहेत. यावेळी रेपो दरात वाढ न केल्याने बँकाही किरकोळ कर्जाच्या व्याजदरात वाढ करणार नाहीत, याचा थेट फायदा घर खरेदीदारांना होणार आहे. चलनवाढ कम्फर्ट झोनमध्ये असल्याने यावेळी रेपो दरात वाढ करण्यात आली नसल्याचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे. मात्र, यूएस फेडरल बँक आणि ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने एप्रिलमध्येही त्यांचे व्याजदर वाढवले ​​होते, त्यामुळे रिझर्व्ह बँकही रेपो दरात वाढ करेल अशी अटकळ बांधली जात होती.

हेही वाचा – CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखील पोलीस दलात 1.30 लाख पदांची भरती..! ‘असा’ भरा अर्ज

जगभरातील वाढती महागाई आणि महागडे कर्ज याबाबत भारतीय बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे चिंता व्यक्त केली होती. महागाई आणि व्याजदर यांच्यातील संतुलन राखण्यासाठी रेपो दरात सातत्याने वाढ करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. मात्र, आमचे काम इथेच संपत नाही. परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास एमपीसीच्या पुढील बैठकीत रेपो दरात पुन्हा वाढ होऊ शकते.

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात (2023-24) भारताचा जीडीपी वाढून 6.5 टक्के होईल, जो आधी 6.4 टक्के असण्याचा अंदाज होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजेच 2022-23 मध्ये विकास दर 5.9 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. यापूर्वी हा दर ५.८ टक्के असण्याचा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षात महागाई 5.2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते. यापूर्वी तो ५.३ टक्के असण्याचा अंदाज होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment