Shaktikanta Das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, रेपो दरमध्ये जाणीवपूर्वक केलेली वाढ आणि पुरवठा साखळी सुधारण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे किरकोळ महागाई कमी झाली आहे. ते आणखी 4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता आणि अल निनोच्या शक्यतेसह आव्हाने आहेत, असेही दास म्हणाले.
ते म्हणाले की, व्याजदर आणि महागाई हातात हात घालून चालतात. त्यामुळेच महागाई नियंत्रणात आली तर व्याजदरही खाली येऊ शकतात. युक्रेन युद्धामुळे गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चनंतर महागाईत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या किमती वाढल्या. गहू आणि खाद्यतेलासारखे अनेक खाद्यपदार्थ युक्रेन आणि मध्य आशिया प्रदेशातून येतात. त्या प्रदेशातील पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली.
ठोस पावले उचलून महागाई नियंत्रणात
गव्हर्नर म्हणाले, “यानंतर लगेचच आम्ही अनेक पावले उचलली. आम्ही गेल्या वर्षी मे महिन्यापासून व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. सरकारी पातळीवरही पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली. या उपायांमुळे महागाई कमी झाली आहे आणि ती आता पाच टक्क्यांच्या खाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर मे महिन्यात 4.25 टक्के या 25 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो 7.8 टक्क्यांवर गेला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझव्र्ह बँकेने गेल्या वर्षी मे ते या वर्षी फेब्रुवारीपर्यंत रेपो दरात 2.5 टक्क्यांनी वाढ केली आहे.”
हेही वाचा – How Do Clouds Make Different Shapes: आकाशात विचित्र ढग कसे तयार होतात? जाणून घ्या त्यामागील कारण
लोकांना महागाईपासून दिलासा कधी मिळणार, असे विचारले असता दास म्हणाले, “महागाई कमी झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ते 7.8 टक्के होते ते आता 4.25 टक्क्यांवर आले आहे. यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. आवश्यक ते पाऊल आम्ही उचलू. या आर्थिक वर्षात आमचा अंदाज आहे की तो सरासरी 5.1 टक्के असेल आणि पुढच्या वर्षी (2024-25) ते चार टक्क्यांच्या पातळीवर आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील. आरबीआयला महागाई 4 टक्क्यांपर्यंत ठेवावी लागेल. यामध्ये 2 टक्के वाढ किंवा घट मान्य आहे.”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!