SBI, HDFC आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी गूड न्यूज..! रिझर्व्ह बँकेची ‘मोठी’ घोषणा

WhatsApp Group

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंड़िया (RBI)ने देशातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह बँकांची नावे जाहीर केली आहेत. ग्राहक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी या बँका इतक्या महत्त्वाच्या आहेत की, या बँकांचे काही नुकसान झाले तर त्याचा फटका संपूर्ण देशाला सहन करावा लागतो. RBI ने डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs) २०२२ ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये एक सरकारी आणि दोन खासगी क्षेत्रातील बँकांची नावे आहेत. २०२२ च्या यादीत मागील वर्षी (२०२१) समाविष्ट असलेल्या बँकांची नावे देखील आहेत.

रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की २०२२ च्या या यादीमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI व्यतिरिक्त, खासगी क्षेत्रातील HDFC आणि ICICI बँक यांची नावे देखील समाविष्ट आहेत. देशांतर्गत व्यवस्थात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या बँकांच्या या यादीमध्ये अशी नावे समाविष्ट आहेत, ज्यांचे बुडणे किंवा अपयश संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकते. अशा बँकांवर आरबीआयची विशेष नजर असते आणि त्यांच्या बुडण्याच्या बातम्याही येत नाहीत.

हेही वाचा – IND Vs SL : विराट, रोहितसह ‘या’ १० खेळाडूंना बाहेरचा रस्ता..! पाहा भविष्यातील ‘नवी’ टीम इंडिया

या बँकांसाठी कठोर नियम

या यादीत येणाऱ्या बँकांवर रिझर्व्ह बँक कठोर पावले उचलते. अशा बँकांना जोखीम भारित मालमत्तेचा काही भाग टियर-१ इक्विटी म्हणून ठेवणे आवश्यक आहे. RBI च्या मते, SBI ला त्यांच्या जोखीम भारित मालमत्तेपैकी ०.६० टक्के टियर-१ इक्विटी म्हणून ठेवणे आवश्यक आहे, तर HDFC आणि ICICI बँकेसाठी ते त्यांच्या जोखीम भारित मालमत्तेच्या ०.२० टक्के आहे.

ही यादी महत्त्वाची का आहे?

वर्ष २०१५ पासून, आरबीआय अशा बँकांची यादी जारी करते ज्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर बारीक नजर ठेवतात. दरवर्षी ऑगस्टमध्ये, रिझर्व्ह बँक बँकांना त्यांच्या आवाक्यात आणि त्यांच्या व्यवसायानुसार रेटिंग देते आणि नंतर सर्वात महत्त्वाच्या बँकांची यादी तयार करते. या यादीत आतापर्यंत फक्त तीन बँकांचा समावेश करण्यात आला आहे. यादीत समाविष्ट असलेल्या बँका बुडण्याचा धोका पत्करता येणार नाही आणि गरज पडल्यास सरकारही त्यांना मदत करण्यास तयार आहे.

हेही वाचा – Post Office Scheme : मोदी सरकारकडून नवीन वर्षाचं गिफ्ट..! तुम्हालाही होईल आनंद; जाणून घ्या!

मार्च २०२२ पर्यंतच्या कामगिरीचा समावेश

RBI च्या या यादीत समाविष्ट बँकांची निवड मार्च २०२२ पर्यंतच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये, RBI ने या यादीत फक्त SBI आणि ICICI बँक समाविष्ट केली होती. नंतर मार्च २०१७ पर्यंतची आकडेवारी पाहता HDFC बँकेचाही समावेश करण्यात आला आहे. २०१५ मध्ये जाहीर झालेल्या पहिल्या यादीत केवळ दोनच नावे असल्याने जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने प्रश्न उपस्थित केले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment