रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यादरम्यान ते म्हणाले की, सर्व सदस्यांच्या संमतीच्या आधारे रेपो दर सलग पाचव्यांदा जुन्या दरावरच राहील. याशिवाय त्यांनी UPI यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली. UPI व्यवहाराची मर्यादा 5 लाख रुपये (UPI Transaction Limit) करण्यात आली आहे. आता तुम्ही एकावेळी 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती.
5 लाखांपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी
नवीन नियमानुसार, तुम्ही हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये UPI द्वारे एकावेळी 5 लाख रुपयांपर्यंत पैसे देऊ शकता. याशिवाय ते म्हणाले की, आरबीआयने जीडीपी वाढीचा अंदाज 6.50 वरून 7 टक्के केला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा आकडा 6.7 टक्के अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जाहीर झालेल्या आकडेवारीत GDP 7.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.
यावेळी त्यांनी महागाईबाबत चिंता व्यक्त करत महागाईचा दर सौम्य असला तरी अन्नधान्य महागाई दरात झालेली वाढ चिंताजनक असल्याचे सांगितले. दास म्हणाले की, महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आतापर्यंत आपण गाठू शकलो नाही. त्यासाठी काम करत राहावे लागेल. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 5.6 टक्के राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत ते 5.2 टक्के राहू शकते. एकूणच, संपूर्ण आर्थिक वर्षात हा आकडा सुमारे 5.4 टक्के राहू शकतो.
हेही वाचा – पालघरच्या बहडोली जांभळाला GI टॅग, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणात 41 अर्थतज्ज्ञांनी नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा आणि टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे महागाईबाबत सरकारची चिंता वाढली आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीला मुदतवाढ दिली आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई दर 4.87 टक्क्यांवर घसरला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!