Bank Holidays January 2023 : जानेवारीत १४ दिवस बँका बंद..! ‘अशी’ आहे सुट्ट्यांची यादी

WhatsApp Group

Bank Holidays January 2023 : हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्ष (२०२३) सुरू होणार आहे आणि त्याची सुरुवात सुट्टीने होणार आहे. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास ते त्वरित निकाली काढा. यासोबतच जर तुम्ही जानेवारी २०२३ मध्ये बँकेसाठी निघालात तर सुट्टीची यादी एकदा तपासून पहा, असे होऊ नये की तुम्ही बँकेत पोहोचाल आणि तेथे टाळे असेल. वर्षाच्या पहिल्या महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नवीन वर्ष २०२३ साठी बँकिंग सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यात बँक रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी यासह एकूण १४ दिवस सुट्टी असेल. मात्र, या बँक सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार असतील. तथापि, या बँक सुट्ट्यांमध्ये तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरून तुमचे काम किंवा व्यवहार सहज हाताळू शकता.

हेही वाचा – E-Challan : …तर तुमचेही पेसे एका झटक्यात कट होतील! जाणून घ्या नाहीतर खिशाला बसेल कात्री

जानेवारी २०२३ साठी बँक सुट्टीची यादी

तारीख कारण स्थान
१ जानेवारी साप्ताहिक (रविवार) संपूर्ण देशात
२ जानेवारी नवीन वर्षाची सुट्टी मिझोराम
८ जानेवारी साप्ताहिक (रविवार) संपूर्ण देशात
११ जानेवारी मिशनरी दिवस मिझोराम
१२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती पश्चिम बंगाल
१४ जानेवारी मकर संक्रांती/माघ बिहु गुजरात, कर्नाटक, आसाम, सिक्किम, तेलंगणा
१५ जानेवारी पोंगल/रविवार संपूर्ण देशात
२२ जानेवारी साप्ताहिक(रविवार) संपूर्ण देशात
२३ जानेवारी नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती आसाम
२५ जानेवारी राज्यत्व दिवस हिमाचल प्रदेश
२६ जानेवारी गणतंत्र दिवस राष्ट्रीय सुट्टी (संपूर्ण देशात)
२८ जानेवारी दुसरा शनिवार संपूर्ण देशात
२९ जानेवारी साप्ताहिक (रविवार) संपूर्ण देशात
३१ जानेवारी मी-दम-मी-फी आसाम

 

या तारखांना साप्ताहिक सुट्टी

नवीन वर्षाची पहिली सुट्टी १ जानेवारी २०२३ रोजी म्हणजेच रविवारी येत आहे. याशिवाय ८ जानेवारी, १५ जानेवारी, २२ जानेवारी आणि २९ जानेवारीलाही रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील. दुसरीकडे, दुसरा शनिवार १४ जानेवारीला आणि चौथा शनिवार २८ जानेवारीला आहे. यासोबतच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनासह अनेक सणांना बँका उघडणार नाहीत.

बँकेच्या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. म्हणजेच, ते राज्य आणि शहरांमध्ये भिन्न आहेत. तथापि, बँकांच्या शाखा बंद असूनही, तुम्ही तुमच्या घरच्या आरामात बँकिंगशी संबंधित काम ऑनलाइन करू शकता. ही सुविधा नेहमीच २४ तास कार्यरत राहील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment