खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या दोन व्यवसायांचे विलीनीकरण केल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. एचडीएफसी बँकेची बँकिंग क्षेत्रातील पकड अधिक मजबूत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी समूहाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावात एचडीएफसीने 6 बँकांमधील 9.50 टक्के हिस्सा खरेदी करण्यास मंजुरी मागितली होती. एचडीएफसी समूह, येस बँक, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, बंधन बँक, आयसीआयसीआय बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यामध्ये 9.50 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँके ने मंजुरी दिली आहे.
देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेचा मूळ समूह असलेल्या एचडीएफसी बँक समूहाला येस बँक, इंडसइंड बँकेसह सहा बँकांमधील भागभांडवल खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. एचडीएफसी बँक समूहाला ही मंजुरी देण्यात आल्याचे एचडीएफसी बँकेने स्पष्ट केले आहे. ज्यात त्याच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचा समावेश आहे. ही मान्यता फक्त 1 वर्षासाठी वैध असेल. याचा अर्थ, जर एचडीएफसी समूहाने अंतिम मुदतीत करार पूर्ण केला नाही, तर ही मान्यता रद्द केली जाईल.
हेही वाचा – VIDEO : अँजेलो मॅथ्यूजने पायावर कुऱ्हाड नव्हे, तर कुऱ्हाडीवर पाय मारला!
या प्रस्तावाला मंजुरी देताना आरबीआयने एक अट घातली आहे की एचडीएफसी समूहाला एक वर्षाच्या आत शेअर्स ताब्यात घ्यावे लागतील, जर ते शक्य झाले नाही तर ही मान्यता रद्द केली जाईल. याशिवाय आरबीआयने असेही म्हटले आहे की एचडीएफसीला हा भागभांडवल पेड अप शेअर कॅपिटल किंवा मतदान हक्कांच्या एकूण होल्डिंगच्या स्वरूपात विकत घ्यावा लागेल. एचडीएफसी बँकेसाठी हा करार अतिशय महत्त्वाचा आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होईल?
लोकांच्या मनात प्रश्न आहे, की या संपादनाचा त्यांच्या बँकिंग सेवेवर परिणाम होईल का? या अधिग्रहणाचा इंडसइंड बँक, येस बँक किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँका, बँकिंग सेवा आणि ग्राहकांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!