Ratan Tata : देशातील दिग्गज उद्योगपती आणि उदारमतवादी रतन टाटा त्यांच्या उदात्त उपक्रमांसाठी नेहमीच ओळखले जातात. रतन टाटा हे व्यवसायासोबतच दानधर्मासाठीही प्रसिद्ध आहेत. टाटा यांनी त्यांच्या उदारतेचे आणखी एक उदाहरण दिले आहे. त्यांनी ट्वीट करून मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्या-मांजरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रतन टाटा यांनी आपल्या ट्वीटमध्ये भटक्या प्राण्यांसाठीही माणुसकी दाखवण्यास सांगितले आहे.
रतन टाटा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लोकांना सांगितले की, ”मान्सून आला आहे. या मोसमात बरीच भटकी मांजरं आणि कुत्री आमच्या गाड्यांखाली आसरा घेतात. अशा परिस्थितीत या भटक्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून गाडी सुरू करण्यापूर्वी आणि गाडीचा वेग वाढवण्याआधी एकदा गाडीखाली प्राणी आहे का ते तपासून पहा.”
'बरसात में कार चालू करने से पहले उसके नीचे चेक कर लें'
उद्योगपति रतन टाटा ने कारवालों से की है मार्मिक अपील #RatanTata @RNTata2000 #Mansoon pic.twitter.com/8M6DmXVd3W
— 4PM News Network (@4pmnews_network) July 4, 2023
हेही वाचा – ITR Filing : ऑडिटशिवाय भरता येईल इन्कम टॅक्स रिटर्न, CA चीही गरज नाही!
रतन टाटा यांनी आपल्या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, जर आपण आपले वाहन न तपासता हलवले तर हे प्राणी गंभीर जखमी होऊ शकतात. ते अपंग होऊ शकतात आणि त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे ते खरोखरच हृदयद्रावक असेल.
Ratan Tata's Monsoon Plea To Save Stray Animals Taking Shelter Under Cars During Monsoons#RatanTata #Monsoon #Animals #Shelter #TataGroup #Netizen #Shelter #TataSteel pic.twitter.com/uIRzmmt6zU
— Business Today (@business_today) July 4, 2023
उद्योगपती रतन टाटा यांना पाळीव प्राण्यांची विशेष ओढ आहे. त्यांना कुत्र्यांची विशेष आवड आहे आणि त्यासाठी ते अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्राण्यांच्या आश्रयस्थानांना देणगी देखील देतात. रतन टाटा यांचा पाळीव कुत्रा गोव्यातील रस्त्यावरचा कुत्रा होता, आज तो त्यांच्यासोबत घरी राहतो.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!