Tata ग्रुपचा ‘मोठा’ प्लॅन..! ४५,००० महिलांना मिळणार नोकऱ्या; वाचा!

WhatsApp Group

Tata Group To Hire 45000 Women Workers : दिग्गज भारतीय उद्योगपती रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूह एक मोठी योजना बनवत आहे. हा समूह तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यात कर्मचारी संख्या वाढवण्याच्या प्रक्रियेत आहे. येत्या दोन वर्षात ४५ हजार भरती करण्याची योजना आखण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक पार्ट्स बनवणाऱ्या टाटाच्या या कारखान्यात आयफोनचे पार्ट बनवले जातात.

दोन वर्षात दिल्या जाणार नोकऱ्या 

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनमधील कोरोना निर्बंधांमुळे अॅपलच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे आयफोन बनवणारी कंपनी भारतात उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. त्यामुळेच देशांतर्गत कंपन्याही विस्ताराचा भाग बनण्याच्या तयारीत आहेत. टाटा समूहाने अॅपलकडून अधिकाधिक ऑर्डर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे अहवालात म्हटले आहे. रतन टाटा यांच्या टाटा समूहाच्या तयारीबद्दल सांगायचे तर, येत्या १८ ते २४ महिन्यांत सुमारे ४५,००० नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या नोकऱ्या बहुतांशी महिलांसाठी असतील.

हेही वाचा – Video : ‘हे’ आहे जगातील सर्वात उंच गाव..! उन्हाळ्यात पडते कडाक्याची थंडी

टाटाच्या प्लांटमध्ये सर्वाधिक महिला कामगार

टाटाच्या ५०० एकरमध्ये पसरलेल्या या प्लांटमध्ये सध्या सुमारे १०००० कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये बहुतांश महिला कामगार आहेत. सप्टेंबर महिन्यातच या प्लांटमध्ये ५ हजार महिला कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले. होसूर प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना १६००० रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कारखान्यात कर्मचाऱ्यांना भोजन, निवास आदी सुविधाही पुरविल्या जातात. याशिवाय कामगारांना प्रशिक्षण आणि शिक्षण देण्याचीही टाटांची योजना आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment