योयो हनी सिंगकडून ‘मनी’ घेत घटस्फोट..! बायकोला मिळणार ‘इतक्या’ कोटींची पोटगी; वाचा!

WhatsApp Group

YO YO Honey Singh Divorce : पंजाबी गायक यो यो हनी सिंग आणि पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाचs न्यायाधीश विनोद कुमार यांच्या न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे. हनी सिंगनं एक कोटी रुपयांचा धनादेश शालिनी तलवार यांना सीलबंद कव्हरमध्ये दिला आहे. हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्यातील उलट-सुलट आरोपानंतर हे प्रकरण कोर्टात मिटलं असून, त्यानंतर दोघांमध्ये एक कोटींच्या पोटगीचा करार झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च २०२३ रोजी होणार असून त्यामध्ये पुढील सुनावणी होणार आहे.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिनंही त्याच्यावर घरगुती हिंसाचार, मानसिक आणि आर्थिक शोषणाचे आरोप केले होते. या खटल्याची सुनावणी तीस हजार न्यायालयात सुरू असून, ३ सप्टेंबर २०२१ पासून या प्रकरणाची इन-चेंबर सुनावणी सुरू झाली. हनी सिंगच्या वकिलानं सीलबंद कव्हरमध्ये एक अहवालही कोर्टात सादर केला. मात्र, त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांच्या चेंबरमध्ये दोघांचेही समुपदेशन केलं. त्याच्याकडून मागच्या सुनावणीत न्यायाधीशांनी हनी सिंगला समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते, तेव्हा हनी सिंग कोर्टात हजर न झाल्याने कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा – VIDEO : ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला! पडले १५० टाके; चेहऱ्यावरचं मांसही…

हेही वाचा – VIDEO : खुळचट कुठले..! राणीच्या मृत्यूनंतर बकिंघम पॅलेसबाहेर कपलचं ‘असं’ कृत्य; एकदा बघाच!

हनी सिंगच्या पत्नीने आरोप

हनी सिंगचे आई-वडील आणि लहान बहिणीनं आपलं शोषण केल्याचा आरोप शालिनी तलवारनं केला आहे. शालिनीनं हनीमूनचं रहस्यही उघड केले आहे. हनिमूनच्या वेळी आपल्याला मारहाण झाल्याचं तिनं सांगितलं होतं. दहा वर्षांच्या प्रेमानंतर त्यांनी २०१० मध्ये साखरपुडा आणि जानेवारी २०११ मध्ये लग्न केलं. हनी सिंगचे इतर महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप शालिनीनं केला आहे. शालिनी तलवारनं घरगुती हिंसाचार, महिला संरक्षण कायद्यांतर्गत १० कोटी रुपयांची भरपाई मागितली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment