भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer In Ranji Trophy) मंगळवारी आगामी रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मुंबई संघात समावेश करण्यात आला. मुंबईला 12 ते 15 जानेवारी दरम्यान आंध्रविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. मुंबईने बिहारविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आव्हानात्मक परिस्थितीत झुंज दिल्यानंतर श्रेयस 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पुन्हा आपला फॉर्म मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.
2018-19 च्या मोसमानंतर श्रेयस रणजी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या सामन्यापासून तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करताना दिसणार आहे. श्रेयसचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा फारसा गाजला नाही, त्याने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 31, 6, 0 आणि नाबाद 4 धावांची खेळी खेळली. श्रेयसची इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी निवड झाल्यास नऊ महिन्यांनंतर अय्यरची ही पहिलीच कसोटी मालिका असेल.
श्रेयस फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळला, जिथे त्याला पाठीला गंभीर दुखापत झाली. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळला आणि भारताला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या मागे तो भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याने 11 डावात 66.25 च्या सरासरीने 530 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.
हेही वाचा – “गुजरात माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी…”, मुकेश अंबानींची मोठी घोषणा!
विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेतही त्याला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. मात्र, गेल्या आठवड्यात श्रेयसला गुरुवारपासून मोहालीत अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
सरफराज खान आणि शिवम दुबे यांच्या अनुपस्थितीत अय्यर त्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेसह मुंबईची फलंदाजी मजबूत करेल. सरफराज हा भारत अ संघाचा भाग आहे, तर दुबेला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
गुडघ्याच्या दुखापतीतून सावरणारा सलामीवीर पृथ्वी शॉही या सामन्यात मुंबई संघाचा भाग असणार नाही. शॉ ऑगस्ट 2023 पासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!