…जेव्हा जपानी डायरेक्टरने बनवलेलं ‘रामायण’ भारतात बॅन झालं होतं!

WhatsApp Group

भगवान श्रीरामाचे भक्त केवळ भारतातच नाही, तर इतर देशातही आहेत. याचे पुरावे आज जगभर पाहायला मिळतात. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरही राम पाहायला मिळाले. भारतात रामायणावर लोकांचे वेगळे प्रेम आहे, त्यावर अनेक नाटके आणि चित्रपट बनले आहेत. हेच प्रेम एकदा जपानमध्येही पाहायला मिळाले होते, जेव्हा तिथल्या एका चित्रपट निर्मात्याने रामायणावर चित्रपट बनवला होता. मात्र, त्या चित्रपटाबद्दल भारतात बराच गदारोळ झाला आणि त्यावर बंदीही घालण्यात आली.

जपानी दिग्दर्शक युगो साको (Yugo Sako) 1983 मध्ये भारतात आले आणि इथेच त्यांना रामायणाची माहिती मिळाली. त्यांनी रामायण सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रामायणाच्या 10 वेगवेगळ्या आवृत्त्या वाचल्या आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यावर चित्रपट बनवायला सुरुवात केली.

चित्रपटाचे नाव ‘रामायण : द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा’ (Ramayana The Legend of Prince Rama) असे होते आणि ते अॅनिमेटेड रामायण होते, ज्याचा भारतातील विश्व हिंदू परिषदेने निषेध केला होता. देव कार्टूनच्या रूपात दाखवावा अशी त्यांची इच्छा नव्हती. युगो साको यांनी आपण भारतीयांच्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावणार नसल्याची ग्वाही दिली आणि त्यानंतर चित्रपट बनवण्याची परवानगी मिळाली.

हा एक मोठा चित्रपट होता, 450 कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवला होता. रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना व्हॉईस ओव्हरसाठी संपर्क करण्यात आला होता. जपानी चित्रपटातील राम या पात्राला त्यांनी आपला आवाज दिला. हा चित्रपट तयार झाला आणि बाबरी मशिदीबाबत भारतात वाद निर्माण झाला. याचे परिणाम युगो साको यांना भोगावे लागले.

हेही वाचा – फॉरेनमध्येही राम मंदिर सोहळा सुपरहिट! लोकांनी वाटले पेढे आणि लाडू

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला होता. 2022 मध्ये, मोदींनी युगो साको यांची भेट घेतली आणि त्यानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यास सांगितले. हा चित्रपट जपानी व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत बनवण्यात आला होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment