

22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Consecration Ceremony) होणार आहे. राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्यादरम्यान पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी, योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्या आणि लखनऊ दरम्यानच्या इंतरसिटी प्रवासासाठी 15 इलेक्ट्रिक वाहने (EVs) तैनात केली आहेत. ही इलेक्ट्रिक वाहने अयोध्या आणि लखनऊ दरम्यान भाविक वापरतील, भविष्यात आणखी इलेक्ट्रिक वाहने तैनात करण्याची योजना आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यावर अयोध्या विकास प्राधिकरणाने (ADA) काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात अयोध्येत चार प्रवासी बसण्याची क्षमता असलेली 15 इलेक्ट्रिक वाहने तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय गतवर्षी दीपोत्सव कार्यक्रमापासून अयोध्येत ई-कार्ट सेवाही सुरू असून, त्यात एकाच वेळी 100 प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. हनुमानगढी आणि श्री रामजन्मभूमी मंदिर परिसर येथे दर्शनासाठी मुख्यत्वे वृद्ध भाविक त्याचा वापर करतात.
हेही वाचा – Health Tips : तुम्ही देखील सकाळी उठल्याबरोबर फोन चेक करता? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!
‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमांतर्गत उत्पादित टाटा टिगोर ईव्ही कार पहिल्या टप्प्यात तैनात करण्यात आल्या आहेत. मंगळवारी, एडीए लखनऊ आणि अयोध्या दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांचे ऑपरेशन सुरू झाले आहे. असे सांगण्यात येत आहे की, मकर संक्रांती 15 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अयोध्येत कलाकार आणि पर्यटकांसह व्हीव्हीआयपी मुव्हमेंट लक्षात घेऊन लवकरच 200 इलेक्ट्रिक वाहनांचा ताफ्यात समावेश केला जाईल.
कार बुक कशी करावी?
पॅशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ‘माय ईव्ही प्लस’ नावाने कॅब सेवा देत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की पिक अँड ड्रॉप सेवा 6 जानेवारीपासून अयोध्या विमानतळावर येणार्या यात्रेकरूंसाठी आहे आणि ती संपूर्ण अयोध्येत चालेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी 9799499299 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधता येईल. याद्वारे वापरकर्ते ही इलेक्ट्रिक कॅब सेवा बुक करू शकतात.
भाडे किती?
लखनऊ ते अयोध्या दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली असून एकेरी प्रवासासाठी प्रवाशांना 3,000 रुपये मोजावे लागणार आहेत. तर अयोध्येत प्रवाशांना 0 ते 10 किमीच्या प्रवासासाठी 250 रुपये, 0 ते 15 किमीच्या प्रवासासाठी 399 रुपये, 0 ते 20 किमीच्या प्रवासासाठी 499 रुपये, 20 ते 30 किमीच्या प्रवासासाठी 799 रुपये आणि 20 ते 30 किमीच्या प्रवासासाठी 799 रुपये मोजावे लागणार आहेत. 30 40 किमीच्या प्रवासासाठी तुम्हाला 999 रुपये मोजावे लागतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!