Rakshabandhan : गेल्या २६ वर्षांपासून पंतप्रधान मोदींना पाकिस्तानी बहिणीकडून येते राखी! तुम्हाला माहितीये?

WhatsApp Group

PM Narendra Modi Pakistani sister : पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची पाकिस्तानची बहीण कमर मोहसीन शेख यांनी राखी पाठवली आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कमर मोहसीन शेख यांनी यावेळी राखीसोबत एक पत्रही पाठवलं आहे, ज्यामध्ये त्यांनी मोदींना यापुढंही पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक वेळी शेख मोदींना राखी आणि पत्र पाठवतात. त्यांनी पत्रात मोदींना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. शेख यांनी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्यांना आशा आहे, की मोदी त्यांना यावर्षी रक्षाबंधनाला बोलावतील आणि त्यासाठी त्यांनी तयारीही केली आहे. भारताच्या पंतप्रधानांना राखी पाठवणाऱ्या कमर मोहसीन शेख कोण आहेत? मोदी आणि मोहसीन शेख एकमेकांना कुठे भेटले? जाणून घ्या शेख यांच्यासंबंधी खास गोष्टी…

कोण आहेत कमर मोहसीन शेख?

कमर मोहसीन शेख या पाकिस्तानच्या रहिवासी आहेत, मात्र त्यांचं लग्न भारतात झालं. शेख २५-२६ वर्षांपासून पंतप्रधान मोदींना राखी पाठवत आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा मोदी आरआरएस कार्यकर्ता होते, तेव्हापासून शेख मोदींना राखी बांधत होत्या. शेख यांनी लग्नानंतर भारतात राहण्यास सुरुवात केल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. गेल्या वर्षीही त्यांनी राखी आणि पत्र पाठवलं होतं.

हेही वाचा – Rakshabandhan 2022 : राखी बांधताना ‘या’ ५ चुका चुकूनही करू नका!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख १९८१ मध्ये पहिल्यांदा भारतात आल्या होत्या. यानंतर त्यांचं लग्न मोहसीन यांच्यासोबत भारतात निश्चित झालं आणि तेव्हापासून त्या भारतात राहू लागल्या. असं म्हटलं जातं की त्या गुजरातचे तत्कालीन राज्यपाल डॉ. स्वरूप सिंह यांना भेटल्या होत्या. सिंह आपल्या त्यांची मुलगी मानतात, असं शेख म्हणाल्या.

”मी एकदा पाकिस्तानला जात असताना स्वरूप सिंह मला विमानतळावर सोडायला आले होते. यावेळी नरेंद्र मोदीही त्यांच्यासोबत होते. यादरम्यान स्वरूप सिंह यांनी सांगितलं, की कमर शेख त्यांची मुलगी आहे आणि त्यानंतर मोदींनी तिला बहीण म्हणून स्वीकारलं. तेव्हापासून मी रक्षाबंधनाला मोदींना राखी बांधायला सुरुवात केली. हे १९९६ पासून कायम आहे”, असं शेख म्हणाल्या.

हेही वाचा – Rakshabandhan : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी राखी..! किंमत ऐकली तर म्हणाल, “तिजोरीतच ठेवली पाहिजे”

मोदींचं यावेळचं रक्षाबंधन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानीतील त्यांच्या निवासस्थानी खास बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. पंतप्रधान मोदींसाठी खास असलेल्या रक्षाबंधनानिमित्त लहान मुलींनी राखी बांधली. पंतप्रधान मोदींसाठी हे विशेष रक्षाबंधन होते, कारण पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर अशा कर्मचाऱ्यांच्या मुली होत्या.

Leave a comment