‘बिग बुल’ राकेश झुनझुनवालांची ‘एक’ इच्छा, जी अपूर्ण राहिली!

WhatsApp Group

Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबईत वयाच्या ६२व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना सकाळी ६.४५ च्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एएनआयच्या वृत्तानुसार, झुनझुनवाला यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती आणि आज त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी हैदराबादमध्ये झाला. त्यांचे वडील राधेश्यामजी झुनझुनवाला मुंबईत आयकर अधिकारी म्हणून काम करायचे आणि आई उर्मिला झुनझुनवाला गृहिणी होत्या. त्यांना सुधा गुप्ता आणि नीना संघारिया या दोन बहिणी आणि एक मोठा भाऊ राजेश झुनझुनवाला, जे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

राकेश झुनझुनवालांचं शिक्षण

राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ मध्ये मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बीकॉम केले. याशिवाय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियामधून सीए (चार्टर्ड अकाउंटंट) केले. २००३ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म RARE Enterprises सुरू केली. राकेश आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या नावाने ही फर्म सुरू आहे. RA म्हणजे राकेश आणि RE म्हणजे रेखा झुनझुनवाला. रेखा झुनझुनवाला या देखील शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. दोघांनी १९८९ मध्ये लग्न केले.

हेही वाचा – शेअर मार्केटचे ‘सचिन तेंडुलकर’ होते राकेश झुनझुनवाला! एका दिवसात छापले होते ९०० कोटी!

राकेश झुनझुनवालांचे ५ गुंतवणूक मंत्र

  • “हवामान, मृत्यू, मार्केट आणि स्त्रिया यांचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. मार्केट स्त्रीसारखा असतो, नेहमी आज्ञाधारक, गूढ, अनिश्चित आणि अस्थिर असतो. तुम्ही कधीही स्त्रीवर वर्चस्व गाजवू शकत नाही त्याचप्रमाणं मार्केटचं आहे.”
  • “नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध जा. जेव्हा इतर विकत असतील तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा इतर खरेदी करत असतील तेव्हा विक्री करा.”
  • “तुम्ही उत्कटतेशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.”
  • “बाजाराचा आदर करा. मन मोकळे करा. काय पैज लावायची ते जाणून घ्या. तोटा कधी घ्यायचा हे जाणून घ्या. जबाबदार रहा.”
  • “शेअर मार्केट नेहमीच बरोबर असतो. त्याची वेळ कधीही नाही.”

हेही वाचा – हृतिक रोशननं थिएटरमध्ये पाहिला ‘लाल सिंग चड्ढा’! म्हणाला, “मी माझ्या…”

झुनझुनवालांची एक इच्छा अपूर्ण!

झुनझुनवाला मधुमेहाचे रुग्ण होते. झुनझुनवाला म्हणाले होते, ”मला कळले आहे की मला कडक शिस्तीचं पालन करावं लागेल. मला डायहेटिज आहे आणि मी पाण्यातील माशासारखा दारू पितो. मला माझी जुळी मुलं २५ वर्षांची झालेली पाहायची आहेत. मला आयुष्यात कोणताही पश्चाताप नाही. माझी एकच इच्छा होती की मी माझ्या वैयक्तिक सवयी सुधारल्या पाहिजेत आणि अधिक व्यायाम केला पाहिजे.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment