नो बिझनेस क्लास, स्वस्त विमानप्रवास! राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा एअर’ची बुकिंग सुरू; नोकरीचीही संधी!

WhatsApp Group

मुंबई : एअरलाइन उद्योगाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी आली आहे. राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी ‘अकासा एअर’ (Akasa Air) पुढील महिन्यात ऑगस्टपासून उड्डाण करणार आहे. यासाठी बुकिंगही सुरू झालं आहे. कंपनीनं स्वत: ही माहिती दिलीय. नवीन एअरलाइन ‘अकासा एअर’नं सांगितलं, की ते बोईंग 737 MAX विमानाचा वापर करून ७ ऑगस्ट रोजी पहिलं उड्डाण होईल. मुंबई-अहमदाबाद हे आपलं पहिलं व्यावसायिक उड्डाण असेल.

तिकीट विक्री सुरू

अकासा एअरनं सांगितलं, की आम्ही २८ फ्लाइटची तिकिटं विकण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर ७ ऑगस्टपासून आणि बंगळुरू-कोची मार्गावर १३ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी प्रवीण अय्यर म्हणाले, “आम्ही मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान नवीन बोईंग 737 MAX विमानाने ऑपरेशन सुरू करत आहोत. आम्ही आमच्या नेटवर्क विस्तार योजने

एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं (DGCA) ७ जुलै रोजी अकासा एअरला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) दिलं. गेल्या वर्षी DGCA कडून कंपनीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर, अकासा एअरनं २६ नोव्हेंबर रोजी ७२ MAX विमानं खरेदी करण्यासाठी बोईंगशी करार केला.

रोजगार, नोकऱ्या…

एकीकडं कंपनी आपले कामकाज सुरू करणार असताना दुसरीकडं क्रू मेंबर्सची नियुक्तीही जोरात सुरू आहे. गेल्या आठवड्यात एका ट्वीटमध्ये, कंपनीनं एअरलाइन क्षेत्राशी संबंधित अधिकाधिक लोकांना अकासावर अर्ज करण्यास सांगितले होते. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर नवीन भरतीशी संबंधित पोस्ट देखील पाहू शकता. विमान कंपनीनं आधीच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

अकासा एअर ही एअरलाइन उद्योगात प्रवेश करण्यासाठी सर्वात कमी किमतीच्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दोन 737 MAX विमानांसह व्यावसायिक उड्डाणं सुरू करणार आहे. बोईंगने एक MAX विमान वितरित केलं आहे आणि दुसरं या महिन्याच्या शेवटी इथं येईल. कंपनीनं म्हटलं आहे की प्रवासी त्यांच्या अधिकृत वेबसाइट akasaair.com वर किंवा Google Play Store वरून Akasa Air ऍप्लिकेशन डाऊनलोड करून त्यांचं विमान तिकीट बुक करू शकतात.

अकासा फ्लाइटमध्ये गरम अन्नासाठी ओव्हन नसतील. पॅक केलेला उपमा/नूडल्स/पोहे/बिर्याणी खाण्यापूर्वी प्रवाशांना ते काही मिनिटं गरम पाण्यात ठेवावं लागेल. कासा एअरच्या विमानांमध्ये एकाच क्लासच्या सीट असतील. यामध्ये कोणताही बिझनेस क्लास असणार नाही.

Leave a comment