रजनीकांत पुन्हा झाले आजोबा..! घरी आला ‘गोंडस’ पाहुणा; पाहा PHOTO

WhatsApp Group

Rajinikanths Daughter Blessed With a Baby Boy : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या अभिनयाचे सर्वांनाच वेड लागलं आहे. रजनीकांत यांनी हिंदी चित्रपटांसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही खूप नाव कमावलं आहे. लोकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात जितकी रस आहे तितकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. रजनीकांत यांच्या घरी पुन्हा आनंदोत्सव साजरा होत आहे, त्यांची धाकटी मुलगी सौंदर्या रजनीकांतनं गोंडस मुलाला जन्म दिला आहे, रजनीकांत पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत.

सौंदर्यानं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. फोटो शेअर करत तिनं लिहिलं, ”देवाच्या अपार कृपेनं आणि आमच्या पालकांच्या आशीर्वादानं, विशगन, वेद आणि मी आज ११/९/२२ रोजी वेदचा धाकटा भाऊ वीर रजनीकांत वनंगमुडी यांचे स्वागत करताना अत्यंत उत्साही आहोत.” सौंदर्यानं तीन वर्षांनी मुलाला जन्म दिला. २०१९ मध्ये, तिनं विशगन वनंमुडीसोबत दुसरं लग्न केलं. यापूर्वी २०१० मध्ये तिनं अश्विन रामकुमारसोबत विवाह केला होता. सात वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. सौंदर्याला पहिल्या लग्नापासून वेद नावाचा मुलगा आहे.

हेही वाचा – रोमँटिक झालं जी..! रणजी खेळणाऱ्यानं टीम इंडियाच्या क्रिकेटरला केलं प्रपोज; पाहा PHOTO

रजनीकांतला दोन मुली आहेत, मोठ्या मुलीचे नाव ऐश्वर्या रजनीकांत आणि दुसऱ्या मुलीचे नाव सौंदर्या रजनीकांत आहे. मोठी मुलगी ऐश्वर्या हिचे लग्न सुपरस्टार धनुषसोबत झालं होतं पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला. सौंदर्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही खूप सक्रिय आहे. ती व्यवसायानं चित्रपट निर्माता, ग्राफिक डिझायनर आणि दिग्दर्शक आहे. ती तामिळ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.

हेही वाचा – Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉकमध्ये १०४१ पदांसाठी भरती..! ‘असा’ करा अर्ज

सौंदर्याची कारकीर्द

तिनं वडील रजनीकांत यांचा कोचादैयान हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शक म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट होता. तिनं २०१७ मध्ये धनुषचा वेलायला पट्टाधारी २ हा चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. याआधी त्यांनी पदयाप्पा, बाबा, चंद्रमुखी, शिवकाशी, माजा, चेन्नई 600028 या चित्रपटासाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम केलं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment