Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर कुलींची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रवाशांचे सामानही उचलले. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने राहुल गांधी आणि कुली यांच्या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ”रेल्वे स्टेशनच्या पोर्टर सहकाऱ्यांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज राहुल त्यांच्यामध्ये पोहोचले आणि त्यांनी म्हणणे ऐकले. भारत जोडो यात्रा सुरू आहे”, असे या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी गेल्या काही काळापासून सातत्याने लोकांना भेटत आहेत. यापूर्वी त्यांनी हरयाणात ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांसोबत शेतात भात लावला होता. यानंतर त्यांनी मोटार मेकॅनिकचीही भेट घेतली. राहुल गांधी दिल्लीतील करोलबागमध्ये मोटरसायकल मेकॅनिकशी बोलताना दिसले.
हेही वाचा – विकला गेला देव आनंद यांचा बंगला, कितीला झाला सौदा? जाणून घ्या!
या भेटीचे अनेक फोटोही राहुल गांधींनी शेअर केले होते. मेकॅनिकशी झालेल्या संवादात राहुल गांधींनी त्यांच्या बाईकचाही उल्लेख केला होता. व्हिडिओमध्ये राहुल म्हणत होते की, ”माझ्याकडे KTM 390 बाईकही आहे. पण ती उभी आहे. सुरक्षारक्षक मला गाडी चालवू देत नाहीत.”
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!