Queen Elizabeth Death : ब्रिटनची राणी एलिझाबेथ-द्वितीय यांचं निधन झालं आहे. भारतासह इतर देशांचे राजकारणी त्यांना आदरांजली वाहत असून ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. राणी एलिझाबेथ यांची ढासळणारी तब्येत गेल्या काही वर्षांपासून चिंतेचा विषय बनली होती. यामुळे त्यांना त्यांचे काही कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचंही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निधन झालं. बकिंघम पॅलेसनं राणीच्या निधनाची दु:खद माहिती दिली, तेव्हा हळूहळू लोक राजवाड्याच्या बाहेर जमू लागले. यावेळी एक कपल आपल्या कृत्यामुळं चर्चेत आलं. लोकांनी या कपलला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.
नक्की काय झालं?
जेव्हा ब्रिटीश वृत्तवाहिनी ‘स्काय न्यूज’ बकिंघम पॅलेसच्या बाहेरील दृश्य दाखवत होती, तेव्हा तेथील लोकांना पावसातही आपली लाडकी राणी आठवत होती. पण त्याचवेळी या चॅनलनं बकिंगहॅम पॅलेन्सच्या बाहेर कॅमेऱ्यावर नाचणाऱ्या एका कपलकडं कॅमेरा वळवला. हे कपल हसताना दिसत होतं. डेली स्टार वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, हे कपल राजवाड्याच्या बाहेर गर्दीत उभं होतं आणि कॅमेराकडं बघून हसत होतं, शिवाय ते सेल्फी घेत होतं आणि अचानक नाचू लागलं.
हेही वाचा – एलिझाबेथनं कमल हसनच्या फिल्मचं शूटिंग सेटवर जाऊन पाहिलं; पण तो पिक्चरंच रिलिज झाला नाही!
@SkyNews take the camera of these rude idiots! Feeling the need to laugh and dance because they're on tv pic.twitter.com/4cKA4rjLHb
— Gill morrissey (@Gillmorrissey3) September 8, 2022
बहुतेक लोक रडत होते आणि दु:खात बुडत होते, तर हे कपल हसत होतं. ट्विटरवर एका यूजरने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला तिच्या बाजूला असलेल्या मोबाईल कॅमेऱ्याचा फ्लॅश पेटवून हसत आणि सेल्फी घेताना दिसत आहे. न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर असल्याचं समजताच त्या महिलेनंही डान्स करायला सुरुवात केली.
१५ पंतप्रधानांना शपथ!
राणी एलिझाबेथ यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं आहे. एलिझाबेथ काही दिवस स्कॉटलंडमधील बालमोरल वाड्यात होत्या. दर उन्हाळ्यात त्या इथं यायच्या. गेल्या काही दिवसांपासून राणीच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि यावेळी फेब्रुवारीमध्ये त्यांना कोविड-१९ ची लागण झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळं राणीनं तिची प्रिव्ही कौन्सिलची बैठक रद्द केल. त्यांन विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. ट्रस राणीला भेटण्यासाठी स्कॉटलंडमधील अबर्डीनशायर येथील बालमोरल कॅसल या निवासस्थानी पोहोचली होती. राणीनं विन्स्टन चर्चिलपासून लिझ ट्रसपर्यंत १५ ब्रिटिश पंतप्रधानांना शपथ दिली.