माजी आमदार आणि भाजप नेत्याला ड्रग्स विकताना रंगेहाथ पकडलं!

WhatsApp Group

Punjab Police Arrests Former MLA In Drug Case : पंजाब पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली भाजपच्या एका नेत्याला अटक केली आहे. काँग्रेसच्या माजी आमदार सत्कार कौर (Satkar Kaur) आणि त्यांचा ड्रायव्हर (पुतण्या) यांना स्पेशल टास्क फोर्सने (STF) फिरोजपूर ग्रामीणमधून अटक केली. त्यांच्याकडून 100 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध मोहालीच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माजी आमदार सत्कार कौर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी घरातून 28 ग्रॅम चिट्टा आणि 1.56 लाख रुपये ड्रग मनी जप्त करण्यात आले. सत्कार कौर यांनी 2022 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंजाब पोलिसांनी कौर आणि त्यांच्या पुतण्याला हेरॉईन तस्करीच्या आरोपाखाली खररमधून अटक केली आहे. त्यांच्याकडून 128 ग्रॅम हेरॉईन आणि 1.56 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – Bank Holidays : दिवाळीपासून सलग 4 दिवस बँकांना सुट्टया! जाणून घ्या तुमच्या शहरात कधी बंद राहतील बँका

पोलिसांच्या पथकांनी बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, वेर्ना आणि शेवरलेट ही चार आलिशान वाहनेही जप्त केली आहेत, ज्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर केला जात होता. पोलिसांनी आरोपी कौर यांना 100 ग्रॅम हेरॉईनची तस्करी करताना रंगेहाथ पकडले. आयजीपी सुखचैन सिंग गिल यांनी ही माहिती दिली.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment