पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना दिवाळी भेट, FD वरील व्याजदरात वाढ!

WhatsApp Group

Punjab National Bank FD In Marathi : पंजाब नॅशन बँकेच्या (PNB) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीबाबत (Fixed Deposit) बदल केले आहेत. तुमचेही या बँकेत खाते असल्यास किंवा एफडी केली असल्यास, या बदलाबद्दल जाणून घ्या. पीएनबीने ठराविक मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

पीएनबीने बँक एफडीचे दर अर्ध्या टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. ज्या ग्राहकांनी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी केली आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे. बँक एफडीचे नवे दर 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना किती व्याज?

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के, 46 ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.5 टक्के, 180 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.5 टक्के दराने व्याज मिळत आहे.

TenureInterest Rates (% p.a.)
Regular CitizensSenior CitizensSuper Senior Citizens
7 to 14 days3.504.004.30
15 to 29 days3.504.004.30
30 to 45 days3.504.004.30
46 to 90 days4.505.005.30
91 to 179 days4.505.005.30
180 to 270 days5.506.006.30
271 days to less than 1 year5.806.306.60
1 year6.757.257.55
Above 1 year to 443 days6.807.307.60
444 days7.257.758.05
445 days to 2 years6.807.307.60
Above 2 years to 3 years7.007.507.80
Above 3 years to 5 years6.507.007.30
Above 5 years to 10 years6.507.307.30

हेही वाचा – VIDEO : शाकिबने हट्ट धरला, मॅथ्यूजने हेल्मेट आपटलं, वर्ल्डकपमध्ये घडली ऐतिहासिक घटना!

जेष्ठ आणि सुपर जेष्ठ नागरिक

PNB ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळत आहे. याशिवाय सुपर ज्येष्ठ नागरिकांना 80 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळत आहे.

कोणत्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याज?

444 दिवसांच्या एफडीवर बँकेकडून सर्वाधिक व्याज दिले जात आहे. यामध्ये सामान्य नागरिकांना 7.25 टक्के, ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.75 टक्के आणि अति-ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 8.05 टक्के व्याज देण्यात येत आहे. बँकेकडून 60 ते 80 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील ग्राहकांना अतिरिक्त व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, बँक अति ज्येष्ठ नागरिकांना 0.80 टक्के व्याज देत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment