Punjab Fidge Blast News In Marathi : पंजाबमधील जालंधरच्या अवतार नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. रविवारी रात्री 12 क्रमांकाच्या गल्लीत हा अपघात झाला. मृतांमध्ये इंद्रपाल, त्यांचे वडील यशपाल घई, पत्नी रुची, नातवंड दिया, मनशा आणि अक्षय यांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी घरातील ज्येष्ठ बलबीर कौर बाहेर बसल्या होत्या, त्यामुळे त्या बचावल्या. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
7 महिन्यांपूर्वी घेतला फ्रिज (Punjab Fidge Blast)
मृत यशपालचा भाऊ राज घई यांनी सांगितले की, कुटुंबाने केवळ 7 महिन्यांपूर्वी डबल डोअर फ्रिज खरेदी केला होता. फ्रिजरला आग लागल्यावर कोणालाही सुटण्याची संधी मिळाली नाही आणि अचानक स्फोट झाला. घराला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर घरातील लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
हेही वाचा – Shahid Afridi : “मटण खायला लागले म्हणून, भारतीय….”, शाहिद आफ्रिदी बरळला!
घरात सर्वजण पाहत होते क्रिकेट मॅच..(Fidge Blast In Punjab News In Marathi)
अपघाताच्या वेळी कुटुंबातील सदस्य टीव्हीवर क्रिकेट मॅच पाहत बसले होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर फ्रिजला आग लागली. कॉम्प्रेसर फुटल्यानंतर फ्रिजमधून गॅसही गळू लागला, त्यामुळे कुटुंबीय बेशुद्ध झाले आणि नंतर आग लागली, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांसह फॉरेन्सिक टीमचे लोकही घटनास्थळी पोहोचले आहेत. घर खूप गजबजलेल्या भागात होते.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!