Viral Video : क्लास सुरू असताना विद्यार्थ्यानं शिक्षकाला झापलं, म्हणाला, “हा विनोद नाही…”

WhatsApp Group

Karnataka Professor And Muslim Student Viral Video : कर्नाटकच्या किनारी भागात वर्ग सुरू असताना एका मुस्लिम विद्यार्थ्याची दहशतवाद्याशी तुलना केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. प्रोफेसरने कथितरित्या विद्यार्थ्याचे नाव विचारले आणि मुस्लिम नाव ऐकून म्हणाले, ”अरे, तू कसाबसारखा आहेस.” या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने प्राध्यापकाला तात्काळ निलंबित केले. मात्र, प्राध्यापकाने या घटनेबद्दल माफी मागितली आणि विद्यार्थी हा आपल्या मुलासारखा असल्याचे सांगितले.

या व्हिडीओमध्ये प्राध्यापकाने त्याला दहशतवादी म्हटल्यावर विद्यार्थ्याला राग येतो आणि म्हणतो, ”तुम्ही असे वक्तव्य कसे करू शकता? ही थट्टा नाही. २६/११ हा विनोद नाही, मुस्लिम असणे आणि या देशात अशा गोष्टींना सामोरे जाणे विनोदी नाही.” यावर प्रोफेसर म्हणतात, ”मला माफ कर. हे चेष्टेमध्ये बोललो होतो, तू माझ्या मुलासारखा आहेस.” यावर विद्यार्थी म्हणतो, ”तुम्ही तुमच्या मुलासोबतही असे वागले असते का? वर्गात सगळ्यांसमोर त्याला दहशतवादी म्हणणार का? फक्त सॉरी बोलून फायदा होणार नाही.”

हेही वाचा – नवा ट्विस्ट..! विनोद कांबळी होणार टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर?

 

सोशल मीडियावर गोंधळ

या व्हिडिओवर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यामध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली आणि प्राध्यापकांनी वैयक्तिक माफीही मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघांमध्ये हे प्रकरण मिटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्याने खळबळ उडाली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment