पहाटे तीनला उठणं, योगासनं करणं आणि..! भारताच्या ‘नव्या’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा दिनक्रम माहितीये का?

WhatsApp Group

मुंबई : द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या रुपात भारताला १५वे राष्ट्रपती मिळाले आहेत. मुर्मू यांच्या आधी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. द्रौपदी मुर्मू यादेशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का द्रौपदी मुर्मू कोण आहेत? त्यांचं आत्तापर्यंतचं आयुष्य त्या कशा जगल्या आहेत? मुर्मूंची जीवनशैली कशी आहे? त्यांचं घर, कुटुंब कसं आहे? द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनशैलीबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

ओडिशाच्या आदिवासी महिला नेत्या आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबात झाला. मुर्मूच्या वडिलांचं नाव बिरांची नारायण तुडू होतं. ते गावाचे प्रमुख होते. गृहजिल्ह्यातून शिक्षण घेतल्यानंतर मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी शिक्षिका म्हणून करिअरला सुरुवात केली. राजकारणात प्रवेश केल्यानंतर नगरसेवक, आमदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री झाल्या. झारखंडच्या राज्यपाल होण्याची संधी मिळाली.

President Of India Droupadi Murmu lifestyle know about her daily routine

मुर्मू यांचा दिनक्रम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रौपदी मुर्मू यांचा दिनक्रम ठरलेला असतो. त्या कितीही व्यस्त असल्या तरी सकाळी लवकर उठून फिरायला, ध्यान आणि योगासनं करायला विसरत नाहीत. त्या रोज पहाटे साडेतीन वाजता उठतात. त्यानंतर त्या फिरायला जातात. घरी योगासनं करतात. मुर्मू वक्तशीर आहेत. असं म्हटलं जातं की त्या कधीही कुठंही उशिरा पोहोचत नाही.

द्रौपदी मुर्मू आपल्यासोबत नेहमी दोन पुस्तके सोबत ठेवतात. एक अनुवाद आणि दुसरी भगवान शिवाची पुस्तिका. त्या कुठंही जातात, तेव्हा त्यांना संभाषणात कोणतीही अडचण येत नाही, त्यांच्याकडं अनुवादाचं पुस्तक असतं. तसंच आपलं ध्यान खंडित होऊ नये म्हणून त्या शिवपुस्तिकेचं पठण करत राहतात.

आयुष्यातील वाईट टप्पा

द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता, जेव्हा त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य त्यांना सोडून या जगातून निघून गेले. तीन मुलं आणि पतीच्या मृत्यूनं त्या पूर्णपणे तुटल्या होत्या. रिपोर्टनुसार, मुर्मू यांच्या मोठ्या मुलाचं रहस्यमयरीत्या निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर मुर्मू जवळपास सहा महिने डिप्रेशनमध्ये राहिल्या. पण या नैराश्यातून त्यांनी स्वतःला बाहेर काढलं. तीन वर्षांनंतर धाकट्या मुलाचाही मृत्यू झाला. तब्बल वर्षभरानंतर त्यांच्या पतीनंही जगाचा निरोप घेतला. सर्वात धाकटी मुलगी अवघ्या तीन वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ध्यानधारणा सुरू केली. आयुष्यातील सर्व दु:खांचा सामना करूनही मुर्मू यांनी हार मानली नाही.

Leave a comment