NDTV मध्ये खळबळ..! प्रणय रॉय, राधिका रॉय यांचा राजीनामा; ‘या’ दोघांची एन्ट्री!

WhatsApp Group

NDTV : एनडीटीव्हीचे मालक आणि संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (RRPRH) च्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) ला दिलेल्या माहितीत, कंपनीने सांगितले की, राजीनामा मंगळवार, २९ नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिन्निया चेंगलवरायन यांची RRPRH च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांसह, अदानी समूहाने एनडीटीव्हीच्या मंडळात प्रवेश केला आहे.

राधिका रॉय आणि प्रणॉय रॉय हे NDTV चे सह-संस्थापक आहेत. RRPR च्या संचालकपदाचा राजीनामा फर्मने आपल्या इक्विटी कॅपिटलच्या ९९.५ टक्के रकमेचे शेअर्स विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) ला हस्तांतरित केल्याच्या एका दिवसानंतर आले आहेत. VCPL ची मालकी AMG मीडिया नेटवर्क लिमिटेड (AMNL), अदानी समूहाची मीडिया शाखा आहे.

हेही वाचा – Post Office च्या या योजनांमध्ये गुंतवणूक करा, पैसे बुडण्याचा चान्सच नाही!

RRPR होल्डिंगने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (बीएसई) पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की शेअर्सच्या हस्तांतरणामुळे अदानी समूहाला एनडीटीव्हीमध्ये २९.१८ टक्के हिस्सा मिळेल. यासोबतच अदानी समूहाने अतिरिक्त २६ टक्के स्टेकसाठी खुली ऑफरही दिली आहे. सेबीने ७ नोव्हेंबर रोजी ४९२.८१ कोटी रुपयांच्या या खुल्या ऑफरला मंजुरी दिली होती. याद्वारे १ कोटी ६७ लाख शेअर्स २९४ रुपये प्रति शेअर या दराने ऑफर करण्यात आले आहेत.

५ डिसेंबरपर्यंत ऑफर

२३ ऑगस्ट रोजी, गौतम अदानी समूहाने NDTV मधील २९.१८ टक्के समभाग खरेदी केले होते, त्यानंतर अदानी समूहाने NDTV चे २६ टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा केली होती. यासाठी खुली ऑफर आणल्याची चर्चा होती. अदानी समूहाने २२ नोव्हेंबर रोजी खुली ऑफर सादर केली होती, जी ५ डिसेंबरपर्यंत खुली आहे. अदानी समूहाने ऑगस्ट २०२२ मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) चे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. VCPL ने २००९ आणि २०१० मध्ये NDTV प्रवर्तकांना म्हणजेच प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना ४०३.८५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात, NDTV मधील २९.१८ टक्के स्टेक कधीही विकण्याची तरतूद कर्जदाराकडून ठेवण्यात आली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment