Adipurush Teaser : जय श्रीराम..! मराठी माणसाच्या मिडास टचनं सजलेला ‘आदिपुरुष’ पाहिला का?

WhatsApp Group

Adipurush Teaser : प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपट बनवणारे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट बनवला आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर अयोध्येत भव्य शैलीत रिलीज करण्यात आला आहे. यावरून प्रभास मोठ्या पडद्यावर चमत्कार करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आदिपुरुष टीझर रिलीज

टीझरमध्ये तुम्हाला प्रभास रामच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. पत्नी सीतेला वाचवण्यासाठी तो लंकेला जात आहे. रामाच्या सोबत लक्ष्मण आणि वानरसेना आहेत. तर दुसरीकडे सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. सैफचे हसणे आणि धडकी भरवणारा लूक सांगत आहे की त्याची भूमिकाही दमदार असणार आहे. टीझरमध्ये सीता बनलेली क्रिती सेनन खूपच सुंदर दिसत आहे. या व्यतिरिक्त, आपण काही उत्कृष्ट व्हिज्युअल देखील पाहू शकता.

हेही वाचा –  IND Vs SA : टॅक्सी ड्रायव्हरचं पोरगं आता टीम इंडियासाठी खेळणार…नाव आहे मुकेश कुमार!

प्रभासच्या या चित्रपटाचे एकाच वेळी हिंदी आणि तेलुगू भाषेत शूटिंग झाले आहे. त्याची कथा ओम राऊत यांनी कोविड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये लिहिली होती. प्रभासला ही कथा आवडली आणि त्याने यात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह आहे. हा हिंदी आणि तेलुगू तसंच तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. आदिपुरुष १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment