PNB ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेने केला ‘हा’ मोठा बदल! करोडो लोकांना मिळणार अधिक फायदा

WhatsApp Group

Punjab National Bank : देशातील सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकने (PNB) कोट्यवधी ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. तुमचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असल्यास, तुम्हाला नवीन वर्षात अधिक फायदे मिळतील. १ जानेवारीपासून बँकेने ग्राहकांसाठी मोठा बदल केला आहे. पीएनबीमध्ये मुदत ठेव ठेवणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याजासह इतर अनेक फायदे मिळतील. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे.

पीएनबीने अधिकृत वेबसाइटवर माहिती

पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आतापासून, ग्राहकांना FD वर ५० बेसिस पॉइंट्स अधिक व्याजाचा लाभ मिळेल. यासोबतच बचत खात्यावरील व्याजदरातही २५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे.

हेही वाचा – LIC ची ‘ही’ पॉलिसी घेतल्यास दरमहा मिळतील २०,००० रुपये..! खर्चाचं टेन्शन नाही

एफडीचे दरही बदलले

मुदत ठेवींच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास, ७ ते ४५ दिवसांच्या FD वर ३.५० टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या एफडीवर ४.५० टक्के दराने व्याज मिळेल.

कोणत्या कालावधीच्या FD वर व्याज वाढले?

याशिवाय, जर आपण १ वर्ष ते ६६५ दिवसांच्या FD बद्दल बोललो, तर त्यात ४५ बेस पॉइंट्सची वाढ झाली आहे, त्यानंतर तुम्हाला ६.७५ टक्के दराने व्याज मिळेल. ६६६ दिवसांच्या FD वर ७.२५ टक्के व्याज मिळेल. ६६७ दिवस ते २ वर्षांच्या एफडीवर ६.७५ टक्के व्याज, २ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.७५ टक्के व्याज, ३ ते १० वर्षांच्या एफडीवर ६.५० टक्के व्याज दिले जाईल.

बचत खात्यावर किती व्याज मिळेल?

जर तुमचे बचत खाते १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला वार्षिक २.७० टक्के व्याजाचा लाभ मिळेल. दुसरीकडे, जर तुमची शिल्लक रक्कम १० लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १०० कोटी रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला २.७५ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. त्याच वेळी, १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम असलेल्या खात्यावर ३ टक्के दराने व्याज मिळेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment