PM Surya Ghar Muft Bijli Yojana : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, ‘या’ 3 गोष्टी करा!

WhatsApp Group

PM Surya Ghar Muft Bijli Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना 300 युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ देण्यासाठी पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना (PM Surya Ghar : Muft Bijli Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 300 युनिट मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. यानंतर तुम्हाला पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.

मोफत विजेसोबत अनुदान

पीएम मोफत वीज योजनेंतर्गत, केंद्र सरकार सबसिडी देखील देईल, ज्यामुळे ही योजना अधिक खास बनते. या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात पाठवले जाईल. या योजनेअंतर्गत अर्ज करणे खूप सोपे आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in वर फक्त 5 मिनिटांत अर्ज करू शकता.

हेही वाचा – 5 वर्षे भाड्याशिवाय हॉटेलमध्ये राहिला माणूस, स्वतःला मालक म्हणवू लागला!

मोफत वीज मिळविण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी करणे आवश्यक आहे?

  • मोफत विजेसाठी (मुफ्त बिजली योजना) 130 चौरस फूट क्षेत्रफळाचे छप्पर असावे.
  • फ्लॅटमध्ये किंवा भाड्याने राहणाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही.
  • छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रथम ४७ हजार रुपये खर्च करावे लागतील. यानंतर यावर सरकार 18 हजार रुपये अनुदान देणार आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला विजेचा वापर आणि इतर गोष्टींची माहिती द्यावी लागेल.

वार्षिक बचत

अधिकृत वेबसाइटनुसार, छतावर सौर पॅनेल स्थापित करून, दररोज 4.32 Kwh/दिवस वीज तयार केली जाईल, जी वार्षिक 1576 kWh/वर्ष असेल. यामुळे ग्राहकाची दररोज 12.96 रुपयांची बचत होईल. वर्षभरात 4730 रुपयांची बचत होणार आहे. जर तुम्ही 700 स्क्वेअर फूटमध्ये सौरऊर्जेची स्थापना केली, तर तुमची 3 किलोवॅट पॅनेलसाठी गुंतवणूक 80,000 रुपये असेल आणि तुम्हाला यामध्ये मिळणारे अनुदान 36,000 रुपये असेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment