PM Modi Salary : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस (PM Narendra Modi’s 73rd Birthday) आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी जवळपास 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2014 मध्ये त्यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली आज देश झपाट्याने प्रगती करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. पण त्यांचे मानधन, सॅलरी किती हा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या संपत्तीबद्दल!
आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा पगार किती आहे, याबद्दल लोकांना नक्कीच उत्सुकता असते. त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे? ते कुठे गुंतवणूक करतात? गेल्या वर्षी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ कार्यालय) याबाबत संपूर्ण माहिती दिली होती. भारताच्या पंतप्रधानांची सॅलरी सुमारे 20 लाख रुपये आहे. यानुसार पंतप्रधान मोदींचे मासिक वेतन सुमारे 2 लाख रुपये आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त, पंतप्रधानांना मिळणाऱ्या मानधनामध्ये दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्ते समाविष्ट आहेत.
हेही वाचा – UPSC Interview Questions : जगातील सर्वात मोठे राष्ट्रगीत कोणत्या देशाचे आहे?
मोदींची एकूण संपत्ती किती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील पंतप्रधान कार्यालयाने 2022 साली जाहीर केला. हा तपशील मार्च 2022 पर्यंतचा आहे. पीएमओनुसार, पंतप्रधान मोदींकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यातील बहुतांश पैसा बँक खात्यात जमा होतो. पंतप्रधान मोदी यांची गुजरातमधील गांधीनगर येथे जमीन आहे. पण नंतर त्यांनी ती दान केली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. आता या जमिनीचा मालकी हक्क त्यांच्या नावावर नाही, कारण त्यांनी आपला हिस्सा दान केला आहे.
पीएम मोदींची किती बचत आहे?
एका अहवालानुसार, पीएम मोदींच्या नावावर कोणत्याही प्रकारचा बॉण्ड नाही आणि त्यांच्या नावावर कोणताही शेअर किंवा म्युच्युअल फंड नाही. याशिवाय त्यांच्याकडे स्वत:ची कोणतीही गाडी नाही. मार्च 2022 पर्यंतच्या मालमत्तेच्या आकडेवारीनुसार, त्याच्याकडे 1.73 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्याच्या बचतीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये 9,05,105 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि 1,89,305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील सरकारी निवासस्थानात राहतात आणि त्यांचा सर्व खर्च स्वतः उचलतात. एका आरटीआयला उत्तर देताना पीएमओने म्हटले होते की, नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून एका दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!