PM Modi Mother Death : हीराबेन यांच्या मृत्यूनंतर मोदींचं भावूक ट्वीट; म्हणाले, “आईमध्ये मला…”

WhatsApp Group

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन यांचे शुक्रवारी पहाटे अहमदाबादच्या रुग्णालयात निधन झाले. हीराबेन १०० वर्षांच्या होत्या. त्यांची प्रकृती बुधवारी खालावली, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीएम मोदींनी त्यांच्या भावासोबत स्मशानभूमीत मुखाग्नी दिला.

मोदींनी स्वतः ट्वीट करून हीराबेन यांच्या निधनाची माहिती दिली. यानंतर सकाळी ७.४५ वाजता ते अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसन गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. हीराबेन यांचे पार्थिव येथे ठेवण्यात आले होते. मोदी पोहोचताच हीराबेन यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. सेक्टर-३० येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा – Video : ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; क्रिकेटर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल!

आईच्या निधनानंतर मोदी म्हणाले…

पंतप्रधान मोदींनी आपल्या आईच्या निधनानंतर एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले, ‘हे ‘वैभवशाली शतक देवाच्या चरणी विसावतो…आईमध्ये मला नेहमीच त्रिमूर्ती जाणवते ज्यात एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचे प्रतीक आहे.”

राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई श्रीमती हीराबा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. या कठीण प्रसंगी, मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना आणि प्रेम व्यक्त करतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment