दिल्ली ते चंदीगड फक्त ३ तासात..! देशाच्या चौथ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला PM मोदींचा ग्रीन सिग्नल

WhatsApp Group

PM Modi Flags Off Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री जय राम ठाकूर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री आणि हमीरपूरचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी उना रेल्वे स्थानक ते दिल्ली या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी हिमाचलमधील उना येथे देशातील चौथ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन दिल्लीहून चंदीगडला आंब-अंदौरा मार्गे जाईल. या ट्रेनने दिल्ली आणि चंदीगडचा प्रवास तीन तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केला जाईल.

या ट्रेनचा वेग किती?

सध्या शताब्दी ट्रेनने दिल्ली आणि चंदीगडच्या प्रवासाला सुमारे साडेतीन तास लागतात. या ट्रेनने दिल्ली ते अंब अंदौरा हे अंतर अवघ्या साडेपाच तासांत कापले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही ट्रेन जास्तीत जास्त १८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते असेही सांगितले जात आहे. ही ट्रेन अंब अंदौरा येथून दुपारी १ वाजता आणि नवी दिल्ली येथून पहाटे साडेपाच वाजता सुटेल. उना ते दिल्ली या प्रवासाला सुमारे साडेपाच तास लागतील.

हेही वाचा – जर्मनीचे नवे वाणिज्यदूत राज्यपाल कोश्यारींना भेटले; म्हणाले…

नवीन वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मागील दोन गाड्यांपेक्षा हलकी आहे आणि फक्त ५२ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते. ही ट्रेन सुरू झाल्याने हिमाचल प्रदेशातील उना भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणाच्या लोकांनाही त्याचा लाभ मिळेल. ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहे, तिला स्वयंचलित दरवाजे आहेत. खुर्ची १८० अंशांपर्यंत फिरवता येते. ट्रेनमध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम टॉयलेट आहेत. यात पॉवर बॅकअप सिस्टम देखील आहे. या ट्रेनला संरक्षक कवच आहे. नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दोन डबे आहेत, ज्यावरून संपूर्ण ट्रेनवर लक्ष ठेवता येते. प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षित वाटावे यासाठी पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यात पुश बटन स्टॉपची सुविधाही आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, एक बटण दाबून ट्रेन थांबवता येते.

त्याच ट्रॅकवर समोरून दुसरी ट्रेन आल्यास वंदे भारत ३८० मीटर आधी आपोआप थांबेल. नवीन वंदे भारत ट्रेनच्या दारे आणि खिडक्यांमध्ये फायर सर्व्हायव्हल केबल्स बसवण्यात आल्या आहेत. आग लागल्यासही ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या सहज उघडता येतील आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर पडता येईल. ट्रेनमध्ये ४ माईक आणि स्विच बसवण्यात आले आहेत. कोणतीही अडचण आल्यास लोक त्यांच्या सीटवर बसून लोको मोटरमनशी बोलू शकतील. वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे पूर्णपणे बॅक्टेरियामुक्त असतील याचीही काळजी घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ट्रेनमध्ये या तंत्राचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून लोकांना संसर्गापासून वाचवता येईल. ट्रेनचे सर्व डबे बॅक्टेरियामुक्त वातानुकूलित असतील.

Leave a comment