

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य प्रदेशातील उज्जैनमधील भाजप खासदार अनिल फिरोजिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान अनिल फिरोजिया यांच्या दोन्ही मुलीही सोबत होत्या. जेव्हा पीएम मोदींनी अनिल फिरोजिया यांच्या पाच वर्षांच्या मुलीला विचारलं, ”तुला माहिती आहे मी काय करतो?” तेव्हा त्या मुलीनं असं उत्तर दिलं, की ते ऐकून पंतप्रधान मोदींना हसू आवरलं नाही.
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, पीएम मोदींनी पाच वर्षांच्या अहाना फिरोजियाला विचारलं, ”तुला माहिती आहे मी काय करतो?” यावर अहानानं मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, ”हो तुम्ही मोदीजी आहात. मी तुम्हाला ओळखते, मी तुला टीव्हीवर पाहिलं आहे. तुम्ही लोकसभा टीव्हीमध्ये काम करता.” मुलीचं हे उत्तर ऐकून खोलीत उपस्थित सर्वजण हसू लागले. पंतप्रधान मोदींनाही हसू आवरता आलं नाही.
आज का दिन अविस्मरणीय है।
विश्व के सर्वाधिक लोकप्रिय नेता, देश के यशस्वी प्रधानमंत्री, परम आदरणीय श्री @narendramodi जी से आज सपरिवार मिलने का सौभाग्य मिला, उनका आशीर्वाद और जनता की नि:स्वार्थ सेवा का मंत्र प्राप्त हुआ। pic.twitter.com/FYHY2SqgSp— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022
अनिल फिरोजिया यांनी मोदींच्या भेटीनंतर ट्वीट केलं की, त्यांच्या दोन्ही मुली पीएम मोदींना भेटून आणि त्यांचे स्नेह मिळवून खूप आनंदी आणि भारावल्या आहेत. ते म्हणाले, ”माझं भाग्य आहे की, देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अशा कष्टाळू, प्रामाणिक, निस्वार्थी, त्यागशील आणि समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.”
नितीन गडकरींचं फिरोजिया यांना चॅलेंज!
पीएम मोदींनी अहानाला रिकाम्या हातानं जाऊ दिलं नाही. पंतप्रधानांनी तिला चॉकलेट दिलं. अनिल फिरोजिया पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी उज्जैनला आले होते. येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्थानिक खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. गडकरी यांनी फिरोझिया यांना आश्वासन दिलं होतं की, ते जितकं वजन कमी करतील, तितका पैसा त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी मिळेल.
नितीन गडकरींनी प्रत्येक किलो वजन कमी करण्यासाठी १००० कोटींच्या कामाचं आश्वासन दिलं आहे. अनिल फिरोजिया यांनी २१ किलो वजन कमी केलं आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघात २१००० कोटींची कामं होतील, असा त्यांना विश्वास आहे. ”शहराच्या विकासासाठी आणि स्वत:च्या आरोग्यासाठी मला जे काही करावे लागेल, ते मी नक्कीच करेन, अशी शपथ गडकरीजींच्या विनंतीनंतर मी घेतली होती. माझे वजन कमी करण्यासाठी मी रोज सकाळी ८ किमी चालतो आणि माझ्या घराच्या बागेत भरपूर घाम गाळतो. माझ्या आहाराची विशेष काळजी घेत मी रोजच्या जेवणात एकच रोटी आणि कोशिंबीर घेतो. वजन १०० किलोच्या आत येताच मी गडकरींना भेटायला जाणार आहे”, असं फिरोजिया म्हणाले.