VIDEO : मोदींची खोल समुद्रात डुबकी, बुडालेल्या द्वारका नगरीला भेट!

WhatsApp Group

PM Modi In Dwarka | गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोल समुद्रात डुबकी मारली आणि प्राचीन द्वारका शहराला भेट दिली आहे. त्यानंतर मोदींचे स्कूबा डायव्हिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मोदींनी आपल्या गुजरात दौऱ्यात रविवारी विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केल्याची माहिती आहे.

मोदींनी खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन द्वारका शहर ज्या ठिकाणी बुडाले आहे, त्या ठिकाणी प्रार्थना केली. डुबकी घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचा अनुभव सांगितला आणि म्हणाले, ”जलमग्न द्वारका शहरात प्रार्थना करणे हा एक अतिशय दैवी अनुभव होता. मला अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेले आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे कल्याण करोत. हे प्राचीन शहर भगवान श्री कृष्णाशी जवळून संबंधित आहे आणि भव्यता आणि समृद्धीचे केंद्र होते.”

मोदी म्हणाले, ”आज मी असे क्षण अनुभवले जे नेहमीच माझ्यासोबत राहतील. मी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारका पाहिली. समुद्रात बुडालेल्या द्वारकेबद्दल पुरातत्व तज्ज्ञांनी बरेच काही लिहिले आहे. ही द्वारका नगरी भगवान विश्वकर्मा यांनी स्वतः वसवली होती असे म्हणतात. आज मला सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्याचे सौभाग्यही मिळाले आहे. सहा वर्षांपूर्वी मला या पुलाच्या पायाभरणीची संधी मिळाली. हा पूल ओखा ते बेट द्वारका बेटाला जोडेल. या पुलामुळे द्वारकाधीशचे दर्शनही सुलभ होणार असून या ठिकाणचे देवत्वही वाढणार आहे.”

हेही वाचा – पंतप्रधान मोदींकडून 41,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण

”मी मुख्यमंत्री असताना स्थानिक लोक माझ्याशी पुलाबद्दल बोलायचे. मी ही बाब तत्कालीन काँग्रेस सरकारसमोर मांडली होती, पण त्यांनी याकडे कधी लक्ष दिले नाही. सुदर्शन पुलाचे बांधकाम माझ्या नशिबात भगवान श्रीकृष्णाने लिहिले होते. सुदर्शन पुलावरील दिवाबत्तीसाठी वीज पुलावर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलमधून येणार आहे”, असेही मोदी म्हणाले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment