रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काय केलं बघा..! Video होतोय व्हायरल

WhatsApp Group

PM Modi Stopped His Convoy For Ambulance : अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी त्यांचा ताफा थांबवला. रुग्णवाहिका निघून गेल्यानंतरच त्यांनी ताफ्याला जाण्याची परवानगी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून गांधीनगरला जात असताना भाट गावाजवळ ही घटना घडली. हा ताफा येथून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागून एक रुग्णवाहिका येताना दिसली. त्यांनी तात्काळ ताफ्याला रस्त्याच्या कडेला उभे राहण्यास सांगितले.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांनी गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय त्यांनी अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी वंदे भारत ट्रेनला विमानाचा पर्याय म्हणून वर्णन केले आणि सांगितले की वंदे भारत ट्रेनमुळे लोकांचा प्रवास सुकर होईल.

हेही वाचा – इंटरनेट स्पीड कमी झालाय? फक्त ‘या’ ३ गोष्टी करा आणि बघा!

झेंडा दाखवल्यानंतर पीएम मोदी त्यात चढले आणि कालुपूर स्टेशनवर पोहोचले. पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमध्ये थलतेज-वस्त्राल मार्गावर १७ स्थानके आहेत. या कॉरिडॉरमध्ये चार स्थानकांसह ६.६ किमीचा भूमिगत विभाग देखील आहे. ग्यासपूर ते मोटेरा स्टेडियमला ​​जोडणाऱ्या १९ किमी उत्तर-दक्षिण कॉरिडॉरमध्ये १५ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यातील संपूर्ण प्रकल्प १२,९०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.

Leave a comment