PM Modi Old Video : गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या अपघातात आतापर्यंत १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७७ जणांची सुटका करण्यात आली आहे. नदीतील लोकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोरबीत बांधलेला हा पूल गेल्या ६ महिन्यांपासून बंद होता. सुमारे २ कोटी रुपये खर्चून या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून तो २५ ऑक्टोबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. हा पूल तुटल्यानंतर लोक पीएम मोदींचा जुना व्हिडिओ शेअर करून टोमणे मारत आहेत.
मोदींचा जुना Video..
पश्चिम बंगालमधील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये कोलकाता येथील विवेकानंद रोड फ्लायओव्हर दुर्घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. पीएम मोदी म्हणाले होते, “निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी ही दुर्घटना घडली आहे या अर्थाने ही एक दैवी कृती आहे, जेणेकरुन लोकांना कळेल की त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे सरकार आहे. देवाने हा संदेश दिला आहे की आज हा पूल कोसळला आहे, उद्या ते संपूर्ण बंगालचा नाश करतील. बंगाल वाचवा हा देवाचा संदेश आहे. हा अॅक्ट ऑफ गॉड नाही, अॅक्ट ऑफ फ्रॉड आहे.” आता विरोधकांनी पीएम मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा – T20 World Cup 2022 : अरे हे काय..? युझवेंद्र चहलचा अंपायरलाच मारण्याचा प्रयत्न; पाहा Video
गुजरात के मोरबी में पुल टूटने से हुए हादसे में हुई जनहानि की खबर अत्यंत दुखद एवं हृदय विदारक है।
मृतकों के परिजनों के प्रति गहरी संवेदना।
कृपया इस तरह की कोई राजनीति ना करें
pic.twitter.com/FVwAlzVjyH— Surendra Rajput (@ssrajputINC) October 30, 2022
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी गुजरात पूल दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. लष्कराच्या ८ तुकड्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. लष्कर, हवाई दल आणि नौदल सातत्याने मदतकार्य करत आहेत. आता या घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.