PM Modi Diwali Gift : दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी देशातील तरुणांना भेटवस्तू देणार आहेत. ते देशभरातील ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. खरं तर, २२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील तरुणांशी संपर्क साधतील आणि ७५ हजार तरुणांना नोकरीचे प्रमाणपत्र सुपूर्द करतील. देशातील विविध शहरातील केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ओरिसातून, मनसुख मांडविया गुजरातमधून, अनुराग ठाकूर चंदिगडमधून, पीयूष गोयल महाराष्ट्रातून सहभागी होणार आहेत. याशिवाय अन्य मंत्रीही विविध शहरांतून सहभागी होणार आहेत. सर्व खासदार आपापल्या लोकसभा मतदारसंघातून कार्यक्रमात सामील होतील.
खरे तर, यावर्षी जूनमध्ये, सर्व विभाग आणि मंत्रालयांचा आढावा घेतल्यानंतर, पीएम मोदींनी घोषणा केली होती की त्यांचे सरकार पुढील दीड वर्षात म्हणजे २०२३ डिसेंबरपर्यंत १० लाख नोकऱ्या देईल. पीएम मोदींच्या घोषणेनंतर मिशन मोडमध्ये या दिशेने काम सुरू झाले. आता त्याच अनुषंगाने पंतप्रधान ७५ हजार तरुणांना रोजगार पत्र देणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अनेकदा मोदी सरकारला गोत्यात उभे करत आहेत.
हेही वाचा – T20 World Cup 2022 : आफ्रिदीचं घातक कमबॅक..! फलंदाजाचा अंगठाच मोडला; पाहा VIDEO
दिवाळीत पंतप्रधान मोदी खूप व्यस्त
या सणासुदीच्या मोसमात पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप व्यस्त असणार आहेत. पीएम मोदी गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला वारंवार भेटी देतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यांमध्ये संरक्षणापासून मुत्सद्देगिरीपर्यंत आणि शिक्षणापासून पर्यावरणापर्यंत अनेक क्षेत्रांचा समावेश असेल. इतकंच नाही तर पीएम मोदींच्या दौऱ्यांमध्ये अध्यात्मिक वारसा ते खेळापर्यंत, रस्त्यांपासून रोपवेपर्यंत, मंदिराच्या जीर्णोद्धारापासून ते पर्यटनापर्यंत, लाईट हाऊसपासून ते लाइफपर्यंत आणि पायाभूत सुविधांपासून उद्योगांपर्यंतच्या क्षेत्रांचा समावेश आहे.