मोदींकडून पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे अभिनंदन

WhatsApp Group

Pakistan’s New PM Shehbaz Sharif | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन करताना मोदींनी म्हटले आहे की, ”पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल शहबाज शरीफ यांचे अभिनंदन.”

पंतप्रधान मोदींनी केवळ एका ओळीत अभिनंदनाचा संदेश दिला. अशा स्थितीत भारतविरोधी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानबाबतच्या त्यांच्या कठोर भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शहबाज शरीफ पुन्हा एकदा नॅशनल असेंब्लीमध्ये 201 मते मिळवून देशाचे पंतप्रधान बनले. ते पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान आहेत आणि सलग दुसऱ्यांदा या पदावर निवडून आलेले ते पहिले आहेत.

पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्या भाषणात, शहबाज शरीफ यांनी, त्यांना या पदासाठी नामांकन दिल्याबद्दल पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाझ शरीफ यांचे आभार मानले आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा – महेंद्रसिंह धोनीच्या मनात नेमकं काय? ‘नव्या’ पोस्टमुळे रंगली चर्चा!

सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी संसद विसर्जित होण्यापूर्वी, शरीफ यांनी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पंतप्रधान म्हणून आघाडी सरकारचे नेतृत्व केले होते. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. तांत्रिकदृष्ट्या 265 पैकी 75 जागांसह हा सर्वात मोठा पक्ष आहे. पीपीपी व्यतिरिक्त, शरीफ यांना मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम-पी), पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू), बलुचिस्तान अe\वामी पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग (झेड), इस्तिकम-ए-पाकिस्तान पार्टी आणि नॅशनल पार्टीचा पाठिंबा आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment