क्या बात है..! पंतप्रधान मोदींचा बर्थडे ठरणार खास; देशाला मिळणार ‘मोठं’ गिफ्ट!

WhatsApp Group

PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्तानं भारताला मोठं गिफ्ट मिळणार आहे. हे गिफ्ट देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण ७० वर्षांनंतर चित्ता देशात परतणार आहेत. १९५२ मध्ये देशातून चित्ता नामशेष झाला आणि आता भारताचा वारसा पुन्हा प्रस्थापित होणार आहे.

कुठं ठेवले जातील चित्ते?

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते सोडण्यात येणार असून, ते नामिबियाची राजधानी विंडहोक येथून आणले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी विंडहोकमधून ५ मादी आणि ३ नरांसह ८ चित्ते आहेत. हे सर्वजण चार्टर्ड विमानानं भारताकडं रवाना होतील आणि १७ तारखेला सकाळी जयपूरला उतरतील आणि तेथून हेलिकॉप्टरद्वारे कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले जातील.

हेही वाचा –  World Dairy Summit : ‘ती’ म्हैस इतकी खास का, जिचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी केलाय?

मांसाहारी प्राणी एका खंडातून दुसऱ्या खंडात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक पाऊलाचं कौतुक करताना पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, की यामुळे पर्यावरण संतुलन राखणं सोपं होईल. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आणण्याची तयारी सुरू आहे. नामिबियासोबत झालेल्या करारामुळं सुरुवातीला हे चित्ते भारतात आणावे लागणार आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते भारतात येणार आहेत. २०२० मध्ये सुप्रीम कोर्टाने नामिबियातून चित्ते आणण्यास ग्रीन सिग्नल दिला होता.

दक्षिण आफ्रिकेचे एक पथक तपासासाठी कुनो अभयारण्यात पोहोचले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलें की, भारतीय वन्यजीव संस्थेचे डीन आणि चित्ता पुनर्स्थापना योजनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ प्राध्यापक यादवेंद्रदेव विक्रम सिंह झाला हे देखील मंगळवारी केएनपीला पोहोचणार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नामिबियामध्ये चित्त्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून ते भारतात येण्यास तयार आहेत. चित्त्यांना येथील जंगलात सोडण्यापूर्वी दोन ते तीन महिने शेडमध्ये ठेवण्यात येईल.

हेही वाचा – Maharashtra Weather Updates : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकणात ‘या’ ठिकाणी ‘ऑरेंज’ अलर्ट!

चित्त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार

अजय दुबे, जीवशास्त्रज्ञ आणि ‘प्रयत्न’चे संस्थापक सचिव म्हणाले, ”चित्त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे ते नामशेष झाले. शेवटचे तीन चित्ते कोरियाच्या राजानं आताच्या घासीदास राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात मारले होते. कोरिया जिल्हा सध्या छत्तीसगडमध्ये आहे. देशातील शेवटचा चित्ता १९४७ मध्ये याच जिल्ह्यात मरण पावला. चित्ता आणि त्याची प्रजाती १९५२ मध्ये नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. ‘भारतातील आफ्रिकन चीता परिचय प्रकल्प’ २००९ पासून सुरू आहे, ज्याने अलीकडच्या काळात वेग घेतला आहे. चित्ता आणण्यासाठी भारताने नामिबिया सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment