PM मोदी बनले रॉकस्टार..! काय तो डान्स, काय तो स्वॅग, सगळं कसं ओक्केमध्ये, पाहा Video

WhatsApp Group

PM Modi AI Dance Video : देशात सध्या राजकीय वातावरण आहे. राजकीय वातावरणात अनेक नेत्यांचे व्यंगचित्र आणि ॲनिमेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ॲनिमेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते डान्स करताना दिसत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डान्सचा AI व्हिडिओ @Atheist_Krishna नावाच्या हँडलने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा AI अवतार रॉक स्टारप्रमाणे नाचताना दिसत आहेत. पीएम मोदींच्या एआय व्हिडिओसोबत युजर लिहितो, “मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे कारण मला माहित आहे की ‘द डिक्टेटर’ मला यासाठी अटक करणार नाही.”

हेही वाचा – VIDEO : संजू सॅमसनची वादग्रस्त विकेट, ‘त्या’ कॅचवर दिल्ली टीमच्या मालकाची रिअॅक्शन व्हायरल!

”निवडणुकीच्या काळात अशी सर्जनशीलता खरोखरच आनंदाची गोष्ट आहे!”, असे मोदींनी या व्हिडिओबाबत सांगितले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment