PM Kisan Yojana : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी (पीएम किसान) १५ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. याबाबत माहिती देताना सरकारने म्हटले आहे की, देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पीएम किसान एफपीओ योजना (PM Kisan FPO Scheme) असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये तुम्हाला १५ लाख रुपयांची संपूर्ण आर्थिक मदत मिळत आहे.
आर्थिक मदत कोणाला मिळेल?
माहिती देताना, सरकारने सांगितले की, या योजनेंतर्गत, ही आर्थिक मदत ११ शेतकरी गटांना म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना (FPO/FPC) शेतीशी संबंधित सर्व व्यवसाय सेटअपसाठी दिली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना एकत्रितपणे एक संस्था किंवा कंपनी (FPO) बनवावी लागेल, ज्यामध्ये किमान ११ शेतकरी असावेत.
हेही वाचा – Viral Video : बंगळुरूमध्ये पैशांचा पाऊस..! नोटा जमवण्यासाठी लोकांची गर्दी; सर्वत्र खळबळ!
अर्ज कसा करता येईल?
- तुम्ही राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.enam.gov.in/web/) जा.
- येथे FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर ‘Registration’ या पर्यायावर जा.
- आता नोंदणी फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.
- आता पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करा आणि अपलोड करा आणि सबमिट करा.
उत्पन्न होणार दुप्पट!
या योजनेअंतर्गत सरकारला देशभरात सुमारे १०,००० एफपीओ तयार करायचे आहेत. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होतील.