नवीन वर्षापूर्वी १४ कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा!

WhatsApp Group

Good News For Farmers : केंद्र सरकारने गरीब आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते आणि बियाणे देण्यासाठी यावर्षी २.५ लाख कोटींहून अधिक खर्च केले जातील, असे पीएम मोदी म्हणाले होते. शेतकऱ्यांना महागड्या खतांपासून दिलासा देण्यासाठी गेल्या आठ वर्षांत सुमारे १० लाख कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

८.४२ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवली आहे, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले होते. पीएम किसानचे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. १३ वा हप्ता २६ जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. ८.४२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. देशभरात १४ कोटींहून अधिक शेतकरी आहेत. महागड्या खतांपासून दिलासा देण्यासाठी खर्च केलेल्या रकमेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हेही वाचा – Cricket Record : कशाला खेळतात हे..! फक्त ६ धावांवर ऑलआऊट झाला संघ; ८ फलंदाज शून्यावर!

भविष्यात ‘भारत युरिया’ या एकाच ब्रँडखाली युरिया उपलब्ध करून दिला जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. यापूर्वी अनेक प्रकारची खते उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. जग वाईट परिस्थितीतून जात असूनही भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तज्ज्ञांच्या मते, १९९० नंतरच्या तीन दशकांत देशाने जो विकास पाहिला, तो गेल्या आठ वर्षांत झालेल्या बदलांमुळे काही वर्षांत होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून जगभरातील देश कोविड-१९ महामारीशी लढा देत आहेत. दुसऱ्या बाजूला संघर्ष आणि लष्करी कारवाया सुरू आहेत. त्याचा देश आणि जगावर परिणाम होत आहे. मोदी म्हणाले, या कठीण परिस्थितीतही भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment