PM Kisan Yojana : केंद्र सरकारने अलीकडेच पंतप्रधान किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. तुम्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 13व्या हप्त्यानंतर लवकरच, 14व्या हप्त्याचे पैसे करोडो शेतकर्यांच्या खात्यात येणार आहेत. 14व्या हप्त्यासाठी सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे. 14व्या हप्त्याबाबत सरकारने बरीच माहिती दिली आहे, ज्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
16,000 कोटी जारी
सरकारने 27 फेब्रुवारी रोजी 13वा हप्ता जारी केला होता. या हप्त्यांतर्गत 16000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, ज्याचा देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
हेही वाचा – Indian Railways : ऐकलं का…ट्रेनचा प्रवास झाला स्वस्त! रेल्वे बोर्डाने दिली ‘ही’ गूड न्यूज
14वा हप्ता मिळविण्यासाठी ‘हे’ काम करा!
सध्या, तुम्हाला पीएम किसानच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागेल, परंतु तुम्ही अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ती त्वरित पूर्ण करा. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाणार नाहीत, असे सरकारने सांगितले आहे. जर तुम्ही हे वेळेत केले नाही तर 13व्या प्रमाणेच तुमचा 14वा हप्ताही अडकू शकतो.
ई-केवायसी कसे केले जाऊ शकते?
- पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा आधार क्रमांक टाका.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.
- यानंतर ‘Submit’ वर क्लिक करा.
- आता तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.
जर 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात अद्याप आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करूनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!