VIDEO : मोदींचा सिडनीत जलवा! ऑस्ट्रेलियात भव्य स्वागत; आकाशात लिहिलं, “वेलकम…”

WhatsApp Group

PM Modi in Australia : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा सिडनीमध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदींचे सिडनीमध्ये खास आणि वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विमानाच्या मदतीने पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी आकाशात ‘वेलकम मोदी’ असे लिहिले होते. पंतप्रधान म्हणून मोदींचा हा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा आहे.

वृत्तसंस्था एएनआयने पंतप्रधान मोदींच्या या भव्य स्वागताचा व्हिडिओ शेअर केला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका सामुदायिक कार्यक्रमापूर्वी आकाशात ‘वेलकम मोदी’ असे लिहिले होते. व्हिडिओमध्ये गुजराती संगीतही वाजत आहे. याआधी पंतप्रधान पापुआ न्यू गिनीमध्ये होते, जेथे देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे पाय स्पर्श करून स्वागत केले होते.

हेही वाचा – IPL 2023 Playoffs : लखनऊ आणि RCB मध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण! ‘असे’ शब्द वापरले की…

त्याचवेळी जपानमधील हिरोशिमा येथे G7 शिखर परिषदेसाठी पोहोचलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधानांचा ऑटोग्राफ मागितला होता. यासोबतच त्यांनी पीएम मोदींना सांगितले होते की, अमेरिकेत लोकांना पीएम मोदींचे किती वेड आहे. मोदींच्या आजच्या कार्यक्रमाबाबत ते सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन सुपरचे सीईओ पॉल श्रोडर, फोर्टेस्क्यु फ्यूचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष अँड्र्यू फॉरेस्ट, हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्षा जीना राइनहार्ट यांची भेट घेतील. याशिवाय ते ऑस्ट्रेलियातील काही प्रभावशाली लोकांशीही भेट घेणार आहेत.

पंतप्रधान मोदी सिडनीतील कुडोस बँक एरिना स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत. जिथे ते प्रवासी भारतीयांना संबोधित करतील. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित राहणार आहेत. या 20,000 सीटर स्टेडियमची सर्व तिकिटे विकली गेल्याची बातमी आधीच आली होती. भारतीय ऑस्ट्रेलियन डायस्पोरा फाउंडेशनद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या फाउंडेशनचे संचालक जय शाह आणि राहुल जेठी आहेत.

Leave a comment