VIDEO : ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला! पडले १५० टाके; चेहऱ्यावरचं मांसही…

WhatsApp Group

Pitbull Attack 11 Year Old Boy : उत्तर प्रदेशमध्ये कुत्र्यानं चावा घेण्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. गाझियाबादच्या सेक्टर २३ संजयनगरमधील एक ताजं प्रकरण समोर आलं आहे. गुरुवारी गाझियाबादच्या संजयनगर येथील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या १० वर्षांच्या मुलावर पिटबुल कुत्र्यानं हल्ला केला. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला. कुत्र्यानं त्याचा चेहरा चावला आहे. यापूर्वी, गाझियाबादमधील एका सोसायटीच्या लिफ्टचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका मुलाला पाळीव कुत्रा चावला होता.

गालावर आणि कानाला चावा

राजनगर एक्स्टेंशनच्या चार्म्स कॅसल सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव पिटबुल कुत्र्यानं एका मुलाला चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. पिटबुल जातीच्या कुत्र्यानं संजयनगर येथील सेक्टर-23 ए ब्लॉकच्या पार्कमध्ये खेळणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याच्या गालाला आणि कानाला चावा घेतला. मुलाला १५० टाके पडले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजयनगर सेक्टर-२३ मध्ये राहणारे सचिन त्यागी यांनी सांगितलं, की ही बाब गेल्या शनिवारी संध्याकाळची आहे. त्यांचा मुलगा कुश त्यागी हा घरासमोरील उद्यानात खेळत होता. उद्यानातच १५ वर्षांची मुलगी पिटबुल जातीचा कुत्रा फिरवत होती.

हेही वाचा की –पाळीव कुत्र्यानं लिफ्टमध्ये घेतला चावा..! वेदनेनं रडू लागलं पोरगं; पाहा VIDEO

चेहऱ्यावरून मांसही…

यादरम्यान कुत्र्यानं मुलीचा हात सोडून कुशवर हल्ला केला. त्यानं कुशच्या गालाला आणि कानाला चावा घेतला. कुत्र्यानं मुलाचा दहा सेकंद चावा घेतला. या हल्ल्यात कुशला रक्तस्त्राव झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरून मांसही बाहेर आले. त्याच्या गालावर, कानावर आणि हातावर पाच खोल जखमा होत्या. उद्यानातील इतरांनी त्याला वाचवलं. कुशला तातडीनं कवीनगर येथील सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथं त्याला १५० टाके लागले. ही शस्त्रक्रिया अडीच तास चालली.

हेही वाचा – IND Vs AFG : “हा शुद्ध हिंदीत बोलतोय..!”, रोहित शर्माचा प्रश्न ऐकून विराट अवाक्; पाहा मुलाखतीचा VIDEO

या प्रकरणी श्वान मालक सुभाष त्यागी यांना महापालिकेनं पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उपमुख्य पशुवैद्यकीय व कल्याण अधिकारी डॉ.अनुज कुमार सिंह यांनी सांगितलं, की सुभाष त्यागी यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याची महापालिकेकडं नोंदणी केलेली नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment