PIB Fact Check : १ मार्चपासून रेशन घेणाऱ्यांना मिळणार नाही मोफत गहू? जाणून घ्या व्हायरल मेसेजचे सत्य!

WhatsApp Group

PIB Fact Check : शिधापत्रिकाधारकांसाठी मोफत गहू योजना १ मार्चनंतर बंद होणार असल्याचा दावा करणारी एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गव्हावर बंदी घालण्यासाठी सरकारने मोठी घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जाणून घ्या व्हायरल बातमीचे सत्य…

१ मार्चपासून शिधापत्रिकाधारकांना गहू मिळणे बंद होईल, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. केंद्र सरकार १ मार्चपासून शिधापत्रिकाधारकांना गहू देणे बंद करत असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ टेक्निकल ब्लॉग नावाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा – Chanakya Niti : माणसाने ‘या’ ५ ठिकाणी क्षणभरही थांबू नये..! जाणून घ्या चाणक्य काय सांगतात

बनावट व्हिडिओच्या कव्हर फोटोमध्ये १ मार्चपासून गहू बंद असल्याचे लिहिले आहे. गव्हाच्या जागी ४ मोठे फायदे दिले जातील. १३ दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला ३.३ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. मात्र या बातमीची चौकशी केली असता सत्य वेगळेच होते.

खरं काय?

आता या बातमीचे सत्य पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करून सांगितले आहे. पीआयबीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘टेक्निकल ब्लॉग’ नावाच्या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की १ मार्च २०२३ पासून शिधापत्रिकाधारकांना गहू मिळणे बंद होईल. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. असा कोणताही निर्णय भारत सरकारने घेतलेला नाही.

सोशल मीडियावर अशा भ्रामक बातम्या व्हायरल होत आहेत, ज्यावर लोक आंधळेपणाने विश्वास ठेवतात. म्हणूनच अशा बातम्यांचे सत्य आधी जाणून घेणे आणि नंतर त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment