PIB Fact Check : आजकाल जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. मोबाईल फोनचा वापर अगदी सामान्य झाला आहे. लोकांना महागडे स्मार्टफोनही पाहायला मिळतात. त्याचबरोबर फोनचा रिचार्जही खूप महाग झाला आहे. दर महिन्याला लोकांना त्यांचे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सुमारे 200-300 रुपये खर्च करावे लागतात. दरम्यान, एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीयांना मोफत मोबाईल रिचार्ज देण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल मेसेज
सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होतात. यामध्ये अनेक फेक मेसेजही व्हायरल होतात, ज्याद्वारे अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचे किंवा लोकांची फसवणूक करून आर्थिक नुकसान करण्याचे काम केले जाते. आता असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची सत्यता पीआयबी फॅक्ट चेकने तपासली केली आहे.
दावा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा सभी भारतीय यूजर्स को ₹239 का 28 दिन वाला रिचार्ज फ्री में दिया जा रहा है #PIBFactCheck
◼️ यह दावा फर्जी है
◼️ भारत सरकार द्वारा यह फ्री रिचार्ज योजना नहीं चलाई जा रही
◼️ यह धोखाधड़ी का एक प्रयास है pic.twitter.com/aGk9u4LJEU— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 3, 2023
हेही वाचा – UPSC चा अभ्यास सोडून टाकलं चहाचं दुकान, आता बनलाय करोडपती!
या व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व भारतीय यूजर्सना 28 दिवसांसाठी ₹ 239 चे फ्री रिचार्ज देत आहेत जेणेकरून 2024 च्या निवडणुकीत अधिकाधिक लोक भाजपला मतदान करू शकतील आणि पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करता येईल.’ यासोबतच या मेसेजमध्ये खाली एक लिंकही देण्यात आली आहे.
बनावट मेसेज
मात्र, पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. हा दावा खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे. ही मोफत रिचार्ज योजना भारत सरकारच्या माध्यमातून चालवली जात नाही. हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अनोळखी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिकही करू नका. हे देखील एक घोटाळा असू शकते.