Indian Oil कडून ग्राहकांना ६,००० रुपयांची सबसिडी..! जाणून घ्या नेमकं प्रकरण

WhatsApp Group

PIB Fact Check : पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. अनेक दिवसांपासून ही किंमत कमी होण्याची अपेक्षा जनतेला होती. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. इंडियन ऑइल (Indian Oil) इंधनावर ६ हजार रुपयांची सबसिडी देते. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल भरण्यावर सूट मिळणार असल्याची एक बातमी सोशल मीडियालर व्हायरल झाली आहे.

६ हजार रुपयांचे इंधन अनुदान

सोशल मीडियावर अनेक बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. दरम्यान एक मेसेज समोर आला. ज्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून ६,००० रुपयांची इंधन सबसिडी दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्ही काही प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास तुम्हाला ही भेट मिळेल. या मेसेजच्या सत्यतेबाबत, PIB ने त्याची सत्यता तपासली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात सरकारी नोकरी हवी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘मोठी’ घोषणा; तरुणांसाठी सुवर्णसंधी!

PIB चे ट्वीट

PIBने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तुम्हाला ६,००० रुपयांची इंधन सबसिडी जिंकण्याची संधी देत ​​आहे. पीआयबीने फॅक्ट चेकद्वारे सत्यता पडताळून पाहिली आहे. हा मेसेज खोटा आहे. इंडियन ऑइलने असा कोणताही मेसेज जारी केलेला नाही.

लकी ड्रॉवर अवलंबून राहू नका

PIBने सांगितले की हा घोटाळा आहे. या लकी ड्रॉवर विश्वास ठेवू नका. या व्हायरल पोस्टमध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारली जाईल. ज्याद्वारे तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते. लक्षात ठेवा की तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment